मायलेकींवर अत्याचार करणारा ठाण्याचा भोंदूबाबा शर्माला कारावास

-

पॉस्को आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षा

भूत-पिशाच्च उतरविण्याच्या बहाण्याने 35 वर्षीय महिलेसह तिच्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या रामलाल शर्मा ऊर्फ मिस्त्रीबाबा (47 वर्षे) याला ठाणे विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाच्या न्यायाधीश कविता शिरभाते यांनी मंगळवारी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना ठाण्यातील कासारवडवली परिसरामध्ये 2017 मध्ये घडली होती.

‘तुम्हाला भूत लागले आहे, ते भूत काढून टाकतो,’ असे रामलाल याने पीडित महिलेला सांगून त्यांच्या 14 वर्षीय मुलीला स्वयंपाकघरामध्ये मंत्रपठणासाठी नेले. तिथे शरीराला दोरा बांधण्याचा बहाणा करीत तिला विवस्त्र केले. नंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेसही स्वयंपाकघरामध्ये नेत तिच्याशी त्याने अश्लील चाळे करीत विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात शर्मा याच्या विरोधात 28 सप्टेंबर 2015 रोजी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. के. चंदनकर यांनी केला. 21 डिसेंबर 2015 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष ‘पोक्सो’ न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात या खटल्याची 10 मे रोजी सुनावणी झाली. यामध्ये सरकारी वकील संजय मोरे यांनी 13 साक्षीदार तपासले.

पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून आरोपी शर्मा याला दोषी ठरविण्यात आले. त्याला दहा वर्षेसश्रम कारावास; तसेच दोन हजार रुपये दंड; दंड न भरल्यास आणखी दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर लहान मुलांच्या लैंगिक अपराधासाठी आणखी दहा वर्षेसश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा; तसेच जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षा शर्माला एकत्रित भोगायच्या आहेत. न्यायालयीन पैरवी म्हणून हवालदार सुनील खैरे यांनी काम पाहिले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]