‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’वर प्रा. अंतेश्वर गायकवाड यांची पीएच.डी.

-

मागील ३४ वर्षांपासून सांगलीहून प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकावर प्रा. अंतेश्वर गायकवाड (लोकजागृती उच्च माध्यमिक विद्यालय, रापका, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी संशोधन करून पीएच.डी. मिळवली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने साधलेला जनसंवाद : एक चिकित्सक अभ्यास’ हा होता. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील ‘वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद’ या शाखेतून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यांच्या पाच वर्षे चाललेल्या संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. बालाजी शिंदे (राणीसावरगाव, जि. परभणी) हे होते. चळवळीच्या मासिकाने विद्यापीठ संशोधनामध्ये स्थान मिळवणे हे अंनिस चळवळीसाठी अभिमानास्पद आहे.

‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकावर पीएच.डी. मिळवणारे प्रा. डॉ. अंतेश्वर गायकवाड हे पहिले आहेत. त्यांना या कामी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी संपादक प्रा. प. रा. आर्डे, व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, संपादक राजीव देशपांडे यांचे सहकार्य मिळाले.

प्रा. गायकवाड यांच्या अं.नि. वार्तापत्रावरील अभ्यासाची उद्दिष्टे ही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा आशय समजून घेणे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांच्या जाणिवांमध्ये झालेला बदल अभ्यासणे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत साधलेल्या जनसंवादाची यशस्वीता तपासणे ही होती. त्यांनी या बाबींवर संशोधन करून असे निष्कर्ष काढले की, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून प्रकाशित होणार्‍या बातम्या, लेख, अग्रलेख यातून जनतेशी थेट अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी जनसंवाद साधला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या अंधश्रद्धांविषयक घटनेवर आळा बसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा आशय विवेकनिष्ठ व बुद्धिनिष्ठ आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचनाने जनतेमध्ये जाणिवांप्रति जागरूकता निर्माण होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जाणीव जागृतीच्या दृष्टीने यशस्वी जनसंवाद साधला आहे.

प्रा. गायकवाड यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]