-
ते उत्सव साजरे करतात
तुमच्या श्रद्धेचे
तुमच्या अज्ञानाचे
तुमच्या निरागसतेचे
तुमच्या भ्याडपणाचे
ते
उत्सव साजरा करतात
आपल्या सत्तेचा
आपल्या दांडगाईचा
आपल्या धूर्ततेचा
ते
तुमच्या नावावरती
तुमच्याकरिता
तुमच्या ईश्वराचा
उत्सव साजरा करतात
ते
तुमच्या ईश्वराकरिता
तुम्हाला वेडे करतात
ते तुम्हालाच
तुमच्याशी लढवतात
मारतात आणि
मारायला लावतात
ते
तुमच्या ईश्वराला
तुमच्यापासून हिसकावून
स्वतः ईश्वर बनतात
तुम्हाला घाबरवतात
मूळ हिंदी कविता : सरला माहेश्वरी
साभारः जानकी पूल
अनुवाद : भरत यादव