अंनिवा -
कोरोना साथीमुळे सध्या रक्ताची कमतरता भासते आहे म्हणून,दि.27 जून 2020 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखा सानपाडा जिल्हा नवी मुंबई यांच्या वतीने रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 146 वी जयंतीचे औचित्य साधून मनपाच्या श्री दत्त विद्यामंदिर सानपाडा सेक्टर 5 येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा हस्ते करण्यात आले.
यास महिला, युवक व अंनिसचे पदाधिकारी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला यामध्ये चेतन सूर्यवंशी (राबाडा),विशाल उघडे(कोपरखैरणे), किरण वाळुंज(सानपाडा), नितीन अंकुश (सानपाडा), सौ माधवी अंकुश (सानपाडा) यांच्या सह 15 रक्तदात्यांनी आपला हक्क बजावला तसेच जवळपास 15 जणांना त्यांच्या असणार्या वैद्यकीय कारणासाठी (बीपी, शुगर,कमी कइ) इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही म्हणून बरेच कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले होते. त्यांची समजूत मनपा वैदयकीय अधिकारी व रक्तपेढीचे कर्मचार्यांनी काढली.
सर्व सहभागी रक्तदात्याना सुधाकर सोनवणे ,भारती अनारे, गजानंद जाधव, अशोक निकम यांच्याहस्ते ’ कोविड योद्धा ’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व रक्त दात्यांसाठी चहा बिस्कीट व भोजन व्यवस्था ही अंनिस सानपाडा शाखेच्या वतीने करण्यात आली होती. याप्रसंगी नगरसेवक सोमनाथ वासकर अंनिसचे जिल्हा सचिव अशोक निकम, मुख्याध्यापक मारुती गवळी, कार्यक्रम संयोजक किरण वाळुंज व कुमार भिवगडे तसेच अंनिसचे जेष्ठ पदाधिकारी गजानद जाधव, पवन कोकाटे, प्रा.अमोलकुमार वाघमारे, सुगत पणाड, भारती अनारे, अशोक अंकुश इत्यादी मान्यवर उपस्थित होते.