नागपूर येथे अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्ह्याच्या विद्यमाने विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी डॉ. गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. प्रादेशिक समाज कल्याण विभागाचे सभागृहात दोन दिवस चालणार्‍या या भव्यदिव्य कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त सामाजिक न्याय विभाग, नागपूर म्हणाले, समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचून महा.अंनिस हे शासनाचे कार्य नि:स्वार्थपणे मोठ्या जोमाने करत आहे. मंचकावर प्रशिक्षक मधुरा सलवारू, सोलापूर, अण्णा कडलासकर पालघर, सम्राट हटकर नांदेड, रामभाऊ डोंगरे, सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य, व चित्तरंजन चौरे कार्याध्यक्ष, व अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रमेश भीया राठोड उपस्थित होते.

आजच्या पहिल्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, बुवाबाजी व चमत्कार सादरीकरण, देवी अंगात येणे, विस्तवावरून चालणे, लोखंडी लंगर उकल करणे, जळता कापूर खाणे इ. चमत्कार मधुरा सलवारू व अण्णा कडलासकर व सम्राट हटकर यांनी कार्यकर्त्यांसमोर प्रस्तुत करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे प्रशिक्षण दोन दिवस चालले व त्यास विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून अंदाजे दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भ अंनिसचे दोन दिवसांचे संघटना बांधणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबरि प्रचंड प्रतिसादात पार पडले.

विदर्भातील महा. अंनिसचे काम पाहिजे तसे मूळ धरत नव्हते, ही खंत डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमीच व्यक्त करायचे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा अशा काही जिल्ह्यांत काम नेटाने सुरू ठेवलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळे आणि गेल्या दहा वर्षात नव्याने जोडलेल्या साथींमुळे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभाग कार्यालयाच्या सुसज्ज हॉलवर पार पडलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिलांची संख्या ४० टक्के होती. युवा कार्यकर्ते चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, गोंदियावरून आलेले होते.

स्थानिक संयोजन उत्कृष्ट होते. १) संघटना बांधणी आणि कार्यकर्ता होणे म्हणजे काय? २) वैज्ञानिक दृष्टिकोन, उगम, मूल्ये, फायदा, आक्षेप ३) मन मनाचे आरोग्य ४) चमत्कार सादरीकरण ५) बुवाबाजीची दाहकता ६) छद्म विज्ञान आणि समाजाची लूट ७) शकून-अपशकुन ८) महिला आणि अंधश्रद्धा ९) व्यसनाचे प्रकार, दुष्परिणाम १०) जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा ११) फलज्योतिष एक थोतांड १२) जोडीदाराची विवेकी निवड १३) विविध उपक्रम १४) प्रश्नोत्तरे १५) चळवळींच्या गाण्यांचा सराव १६) सांस्कृतिक कार्यक्रमात नाटिका, एकपात्री प्रयोग, कविता, नृत्य आविष्कार यातून प्रबोधन असा भरगच्च कार्यक्रम ठरलेल्या वेळेत पार पडला. शिबिराची सुरुवात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन करून झाली. तर सांगता “हम होंगे कामयाब” या गीताने झली.

ज्येष्ठ वक्त्या मधुरा सलवारू सोलापूरवरून आल्या होत्या. ७७ वर्षांची महिला आज ही मार्गदर्शक म्हणून उत्साहात संवाद घेतेय ही गोष्ट सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. नांदेडवरून सम्राट हटकर आणि पालघरवरून अण्णा कडलासकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (झझढ) द्वारेच सर्व विषय मांडले. गाणी हा चळवळीत चैतन्य निर्माण करणारा भाग; इथे त्याचा प्रत्यय आला. वार्तापत्र नोंदणी, पुस्तक विक्री, नव्या पुस्तकांचे संच बुकिंगसाठी व्यवस्था होती. नागपूर जिल्हा सामाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड हे उद्घाटक होते. त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा प्रचारसाठी स्वतंत्र कक्ष या कार्यालयात दिला आहे. वर्धा आणि नवेगाव बांध इथे पुढील कार्यकारिणी व्हावी, अशी मागणी आली. पुन्हा पुन्हा असे शिबिर घ्या, ही इच्छा सर्वांनी व्यक्त केली. महा. अंनिस नागपूर जिल्हा राठोड, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, राज्य कार्यकारी समिती सदस्य रामभाऊ डोंगरे यांच्या पुढाकाराने हे संवाद शिबिर छान झाले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]