अंनिस गोरेगाव शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा

सई सावंत -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गोरेगाव शाखेने दिनांक २५ मे रोजी एकदिवसीय कार्यशाळा राबवली. अंनिसचे कार्य, डिजिटल बुवाबाजी, संतपरंपरा, चमत्कार सादरीकरण, जादूटोणाविरोधी कायदा अशा अनेक विषयांवर सत्रे झाली आणि उपस्थितांचाही उत्साह भरभरून होता. २० शिबिरार्थींमध्ये अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग होता हे उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमेश सुतार यांनी अंनिसचा परिचय आणि प्रास्ताविक मांडले. प्रथमेश कुरणे यांनी ‘भूत’ या संकल्पनेचे चार प्रकार उलगडत त्यांद्वारे समाजातील भीती, अंधश्रद्धा आणि गैरसमजांना कसे खतपाणी घातले जाते हे कथांमधून रंजकरित्या नमूद केले. ज्योती मंडालकर यांनी अभ्यासपूर्णतेने संतांचे अंधश्रद्धा निर्मूलनातील योगदान या विषयावर विवेचन केले. सई सावंत हिने आता जोम धरणारे डिजिटल बुवाबाजीचे प्लॅटफॉर्म्स आणि त्यांना आपण ग्राहक हकांच्या मदतीने कसे सामोरे जाऊ शकतो यावर संवादात्मक सत्र घेतले. भोजनानंतर संगीता पांढरे आणि शुभदा निखार्गे यांनी चमत्कार सादरीकरण केले व त्याचे स्पष्टीकरणही केले. या सत्राला सर्वांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. मुक्ता दाभोलकर यांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम’ यांची ओळख करून दिली व अनेक उदाहरणे आणि वृत्तं मांडत कायद्याचे महत्त्व नमूद केले. वंदना शिंदे यांनी अंधश्रद्धा विरोधातील त्यांचे लढे या विषयावर त्यांच्या अनुभवांचे अतिशय रंजक वर्णन केले. वंदना शिंदे यांचा यु. आर. एल. फाउंडेशन कडून होणार्‍या सामाजिक गौरव पुरस्काराची आणि उपस्थित गौरव सर्जेराव, ओमकार बागवे आणि जयेश दळवी या पुण्यातील विवेक रेषा कार्यक्रमाची संकल्पना पुढे नेणार्‍या व्यंगचित्रकारांची सत्काराने दखल घेतली गेली. कार्यक्रमात एकूणच चळवळीची गीते आणि संवादात्मक सत्रे यांमुळे शिबिरार्थींकडून प्रतिसाद आणि अभिप्राय चांगला मिळाला. कार्यक्रमाची सांगता ‘हम होंगे कामयाब’ या गीत प्रस्तुतीने झाली.

सई सावंत, गोरेगाव शाखा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]