समाजाला ग्लानीमध्ये ठेवून सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे कारस्थान – माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे

-

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तिकांच्या संचाचे पुण्यात प्रकाशन

डॉ. दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे ‘नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मालिकेतील १५ पुस्तिकांचे प्रकाशन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते दिनांक १७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे तसेच अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख हे उपस्थित होते.

भारत सासणे मनोगतात म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम मानवतावाद, विवेकवादापर्यंत आणून ठेवले आहे. समाजाला ग्लानीमध्ये ठेवून त्यांना आज्ञाधारी बनवून आपल्या नियंत्रणात आणण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहेत. लोकांनी वेगळ्या पद्धतीने विचार करू नये असे शिक्षणाचे धोरण बनवण्यासाठी प्रतिगामी शक्ती सक्रिय आहेत. बालवयात आणि तरुण वयात होणारे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अंनिसने प्रकाशित केलेल्या या १५ पुस्तिका कामाला येतील. म्हणूनच ‘नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी ’ हे अभियान महत्त्वाचे आहे.

प्रतापराव पवार म्हणाले, “आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगतो. पण आपण ज्ञानात गुंतवणूक न केल्याने आणि आपण जातिव्यवस्था, कर्मकांडामध्ये अडकून राहिल्याने आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला नाही. डॉ. दाभोलकर यांनी लोकशिक्षण या एकमेव मार्गाचा अवलंब करून त्याद्वारे वैज्ञानिक वृत्ती पसरवण्याचे काम केले. त्याचाच धागा पुढे नेऊन संशोधनात आपण गुंतवणूक केली पाहिजे.”

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज रुजले पाहिजे. ज्या कुटुंबात विवेकी विचार रुजतो, त्या घरात नकीच प्रगतीशील वातावरण तयार होते. आणि तेच या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या निमित्ताने दिसून येते. त्यामुळे सत्यशोधक विचारांची परंपरा असलेल्या रयत शिक्षण संस्थेत रॅशनल थिंकींग सेल आणि सायको सोशिओ कौन्सिलिंग सेलच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे काम पुढे जाईल अशी आशा आहे.”

विनोद शिरसाठ म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेलं साहित्य हे अद्वितीय आहे, कारण त्यांनी केलेल्या लिखाणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यामुळे येणार्‍या पाच वर्षांत दाभोलकरांचे लिखाण सर्व इतर भारतीय भाषांत आणि जगातील सुद्धा भाषांत जाईल आणि सर्वांचे प्रबोधन करेल. या सर्व पुस्तकांत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सर्व मूल्ये, निर्भयता, नीती, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सर्व व्यक्त होतात.”

महाविद्यालयाच्या सायको सोशल सेल आणि रॅशनल थिंकिंग सेलचे उद्घाटनही या वेळी झाले.

या कार्यक्रमास अंनिसचे कार्यकर्ते डॉ. अरुण बुरांडे, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, रुपाली आर्डे, अरविंद पाखले, अलका जाधव, प्रा. सविता पाटील उपस्थित होत्या. प्राचार्य अरुण आंधळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]