आंतरजातीय/धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार!

-

जाती निर्मूलनाच्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आश्वासक पाऊल

अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक दि. ८ व आणि ९ जून रोजी सोलापूर येथे हिराचंद नेमचंद कार्यालयात शालिनीताई ओक विचारमंचावर अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी राज्यभरातून १७५ अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ जिल्ह्यातून जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसाच्या अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले. ते असे –

१) नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत मुंबई हायकोर्टात अपील करणे. निकालाचा मराठी अनुवाद करून तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणे.२) ’नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ हे अभियान २० जून ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सुरू करणे. यामध्ये डॉ. दाभोलकरांच्या १५ पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या साठ हजार प्रती वितरीत करणे.

३) आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणार्‍यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करणे. ४) धार्मिक स्थळावर दैवी उपचार घेणार्‍या मानसिक रोग्यांसाठी ’दवा आणि दुवा प्रकल्प’ सुरू करणे. ५) सन २०२४ हे वर्ष ’प.रा.आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष’ जाहीर करून पुढील सहा महिन्यात प्रामुख्याने सोलापूर,सांगली,पुणे, रत्नागिरी, खेड या ठिकाणी दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजन करणे. तसेच मुंबई, बीड, अहमदनगर, पालघर, धाराशीव, रत्नागिरी या जिल्ह्यात शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे. ६) सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे.

राज्य कार्यकारणी बैठकीचा समारोप रविवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध सर्जन व डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे वर्गमित्र डॉ. बी.वाय. यादव (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद, ग्रामीण कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ‘हम होंगे कामयाब एक दिन’ या गीताने बैठकीची सांगता झाली.

उषा शहा, सोलापूर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]