कैलास महामुने - 8698500507

दगडाच्या देवळात दगड
बसताना पाहिला
माणसाच्या हातांनी
घडताना पाहिली
मैफिल दुकानांची
अशी भरताना पाहिली
हळूच माळ कोणी
पैशाची वाहिली॥1॥
माणुसकी माणसाची
अशी जाताना पाहिली
पायरीवरची चिमुरडी
जेव्हा हात पसरवत राहिली ॥2॥
त्याच्या पुढचा नैवेद्य
तिच्या डोळ्यातच राहिला
हळूच घेऊन जातांना
मी पुजारीच पाहिला ॥3॥
–कैलास महामुने
मु.पो. केळवद ता.चिखली, जि.बुलडाणा
मो.8698500507