-

अंनिसची राज्यभर निर्दशने, मॉर्निंग वॉक, पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
संकलन : राहुल थोरात
शाखा : सांगली
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागचे सूत्रधार शोधले नाही तर देशातील विवेकवादी विचारवतांच्या अभिव्यक्तीला धोका – अंनिस
– सीबीआयने तपास न थांबवता सूत्रधार शोधावा.
– सांगली अंनिसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्टला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्यावतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार श्री. गुरव यांना निवेदन दिले. याप्रसंगी अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, गीता ठाकर, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा, आशा धनाले, श्रीकृष्ण कोरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तूल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०२० मध्ये झालेली आहे. कर्नाटक एस.आय.टी.ने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता, यावरून हे खून करणार्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल.
सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे. या निवेदनाद्वारे अंनिसने मागणी केली आहे की, पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा, देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला केली आहे.
शाखा : जालना
मारेकरी पकडले सूत्रधार कधी पकडणार…
नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनांमागील सुत्रधार पकडावेत, अशी मागणी जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमप्रसंगी करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शंकर बोर्डे, जिल्हा पदाधिकारी संजय हेरकर, संतोष मोरे, मनोहर सरोदे, दीपक दराडे, अॅड. संजय गव्हाणे, माया गायकवाड, अनुराधा हेरकर, सुरेखा भालेराव, सुभाष कांबळे, राजेभाऊ मगर, संदीप इंगोले, संतोष धारे, जगन वाघमोडे, संतोष लवटे, गौतम भालेराव यांची उपस्थिती होती.
शाखा : परतूर (जि. जालना)
दाभोलकर हत्या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करा – परतूरला अंनिसची मागणी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा परतूर, जि. जालनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून करण्यात आली.
निवेदनावर रमेश बरीदे, कल्याण बागल, एकनाथ कदम, अशोक तनपुरे, प्रल्हाद माने, रमेश आढाव, लिंगनवाड यांच्या सह्या आहेत.
शाखा : सातारा
जवाब दो आंदोलन
खून करणारे हात शोधले, मेंदू कधी शोधणार? असा सवाल विचारत विवेकवादी नागरिक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते, परिवर्तन संस्था सदस्य व तरुण यांनी जबाब दो, जबाब दो.., आणि शाहू-फुले-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर. अशा घोषणांनी छ. शिवाजी महाराज पुतळा, पोवई नाका, सातारा परिसरात जागर केला.
सुरुवातीस “अभिवादन करून तुम्हा डॉ. दाभोलकर…” हे अभिवादन गीत गायले.
त्यानंतर अंनिस जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बर्गे यांनी आम्ही विचाराची लढाई विचारणे लढणार असल्याचा निर्धार बोलून सर्वांना अभिवादनबाबत मार्गदर्शन केले. प्रमोदिनी मंडपे यांनी विवेकाचा आवाज बुलंद करूया, असे प्रतिपादन केले. जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने यांनी डॉक्टरांचे कार्य जोमाने पुढे जात आहे आणि त्यास लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले. युवा वाहिनीचे मोहसीन शेख यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वत्र पोहोचविण्याचे काम जोमाने करण्याचे घोषित केले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर कणसे, उदय चव्हाण, डॉ. दीपक माने, मगदूम सर, वसंत धुमाळ, प्रकाश खटावकर, विजय पवार, हौसेराव धुमाळ, डॉ. प्रदीप झनकर, दशरथ रणदिवे, चंद्रकांत भिसे, सुधीर साळेकर, धडवाई आणि तरुण कार्यकर्ते प्रवीण माने, वीर पोतदार, महिला प्रतिनिधी रुपाली भोसले, योगिनी मगर, राणी बाबर, वर्षा पवार, सानिया शिंदे, हर्षाली पोतदार आणि अनेक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करून विवेकाचा आवाज बुलंद करूया… असा नारा दिला.
सातारा येथे डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांचे लोकार्पण
“वैज्ञानिक दृष्टिकोन सोप्या भाषेत सांगणारे, विवेकी, साधी राहणी व शांतपणे ऐकून कृतिशील चिकित्सा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर,” असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र माने, प्रसिद्ध लेखक यांनी केले.

सातारा येथे दि.२२ ऑगस्ट २०२३ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिननिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ज्या शाळेत प्रथम दाखल झाले आणि ज्ञानार्जन सुरू केले” त्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, सातारा येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार घरोघरी १२ पुस्तक लोकार्पण सोहळा कार्यक्रमात राजेंद्र कांबळे (समन्वयक) यांनी स्वागत व प्रास्ताविक करून समतेचा विचार कृतीत आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
डॉ. दीपक माने (अंनिस सातारा शहर कार्याध्यक्ष) यांनी डॉ. दाभोलकरांचे कार्य, अंनिस इतिहास, देव आणि धर्माबाबत अंनिसची भूमिका, चतु:सुत्री सांगून अभिवादन केले. यावेळी कॉ. राजेंद्र माने यांच्याहस्ते पाण्याने दिवा पेटवून उद्घाटन करण्यात आले. प्रमोदिनी मंडपे मॅडम (ज्येष्ठ अंनिस साथी) यांनी रोचक कथा सांगून रीती, परंपरा निर्माण कशा होतात हे सांगितले. डॉ राजेंद्र माने यांनी सविस्तर माहिती देत १२ पुस्तके कशी उपयुक्त आहेत, हे सांगून एक गोष्ट सांगून मुलांना प्रोत्साहित केले. उदय चव्हाण यांनी लंगर सोडविण्याचे प्रत्यक्षिक दाखवून पाण्याचा दिवा पेटवण्यामागचे विज्ञान सांगितले. शाळेस डॉ. दीपक माने यांनी एक संच भेट दिला.
त्याचे रोज वाचन करणार असल्याचे कांबळे सर यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक स्टाफ, अंनिसचे सुकुमार मंडपे, वसंत धुमाळ, प्रकाश खटावकर, डॉ. प्रदीप झनकर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे वृत्तांत लेखन, छायाचित्रण केले.
शाखा : बार्शी

निर्भय मॉर्निग वॉक आणि पुस्तक प्रकाशन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘खुनामागील सूत्रधार कधी शोधणार?’ असा सवाल करीत रविवारी दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा बार्शी यांच्यातर्फे बार्शी शहरात “निर्भय मॉर्निंग वॉक” चे आयोजन करण्यात आले.
अंधश्रद्धेच्या जोखडांमधून समाजाला मुक्त करण्यासाठी झटणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या २० ऑगस्ट २०१३ ला मॉर्निंग वॉकला गेल्यावर झाली होती. त्यांच्या विवेकवादी विचारांशी बांधिलकी दाखवण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. अशोक कदम व प्रा. हेमंत शिंदे यांच्या प्रस्तावनेनंतर अंनिस अध्यक्ष प्रा. दीपा सावळे यांच्या उपस्थितीत वॉकला सुरुवात झाली. विवेकवादी नागरिक व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यां समवेत ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर’, ‘विवेकवाद जिंदाबाद, विज्ञानवाद जिंदाबाद’ आदी घोषणा देत लहान मुलांसह महिलांचाही सहभाग उल्लेखनीय होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत, शेवटी तहसीलदारांना निवेदन देऊन सांगता करण्यात आली. तत्पूर्वी कॉ. तानाजीराव ठोंबरे सर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. चंद्रकांत मोरे, श्री. शिवाजी महाविद्यालय मधील ‘रॅशनल थिंकिंग सेल’ या विभागाचे पालके सर व समितीचे सदस्य रवीकिरण कानगुडे, कॉ. प्रवीण मस्तुद यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी समितीचे कायदेविषयक सल्लागार काकासाहेब गुंड, कार्याध्यक्ष उन्मेष पोतदार यांच्यासह बालाजी करंजकर, संजय मोरे, अजय मोकाशी, सोमनाथ वेदपाठक, स्वप्निल तुपे, आबा राऊत, भारत भोसले, प्रा. माधुरी शिंदे, सौ. जयश्री पोतदार, सौ. संगीता कदम, डॉ. सुरवसे मॅडम, सौ. विद्या पोतदार, शिवांजली शिवाजी खराडे, श्रावणी उल्हास पोतदार, प्रा. किरण गाढवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे सचिव सुरेश जगदाळे सर यांनी निर्भय मॉर्निंग वॉकला उपस्थित राहिल्याबद्दल समविचारी संघटनांसह सर्व उपस्थितांचे आभार मानले.
शाखा : कोरेगाव (जि. सातारा)
अभिवादन सभा
समाजामध्ये कोणत्याही बदलाविषयी एक भय असते जे काही चालू आहे ते ठीक आहे, चांगले आहे असे समाज मानतो “उजळवया आलो वाटा, खरा खोटा निवाडा” असं तुकोबाराय यांनी म्हटलेले होते. अंधश्रद्धा, रुढी, परंपरा किती कालबाह्य झाल्या तरी समाज त्याच टिकऊन धरतो म्हणूनच समाजाने विज्ञानवादी व विवेकवादी व्हावे हेच दाभोलकरांना अभिवादन ठरू शकते, असे सी. आर. बर्गे यांनी अंगापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व नारायण गुजाबा कणसे (आप्पा) ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे मत व्यक्त केले.
बहुजन उद्धारकांनी, महापुरुषांनी हाच संदेश देऊन समाज सुधारण्यासाठी योगदान दिले. समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरेमुळे येथील गोरगरिबांची सामान्य जनतेची हानी होत आहे म्हणूनच तुकोबाराय म्हणतात “ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू” हा सुधारणावाद सुद्धा तुकोबारायांनी सांगितला हा विचार घेऊन आपण उभे राहिले पाहिजे, असे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक दीपक ढाणे यांनी केले. डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूस २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्ष होत आहेत. त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विश्वास चव्हाण, अर्जुनराव भोसले, सुधाकर बर्गे, उपसरपंच हनुमंत आबा कणसे व स्थानिक ग्रामस्थ व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
शाखा : कोल्हापूर
खुनाच्या मास्टर माईंडला पकडा आणि शिक्षण क्षेत्र धर्मांधापासून मुक्त ठेवा – अंनिसची मागणी
कोल्हापूर दिनांक १९ आज शनिवार दिनांक १९ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरच्या वतीने कदमवाडी परिसरामध्ये निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकात मॉर्निंग वॉक मागील भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूरचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांनी दाभोलकरांच्या खुनाला दहा वर्षे पूर्ण होऊन सुद्धा मास्टर माईंडपर्यंत तपास यंत्रणा पोहोचत नाहीत याबद्दल निषेध केला.
कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची नगरी आहे. इथे सर्व धर्माचे-जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. पण ही ओळख पुसण्याच्या प्रयत्नात काही धर्मांध शक्ती आहेत. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिरू लागल्या आहेत.
धर्माच्या नावावर वांदे काढून शाळा-कॉलेजमध्ये धार्मिक तेढ तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्याचे ठरले. “भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये करण्यात यावी, शाळा कॉलेजमध्ये धार्मिक प्रार्थना घेऊ नयेत. देवधर्माचे फोटो लावू नयेत. धार्मिक सण साजरे करू नयेत. राष्ट्रीय सण साजरे करावेत. विद्यार्थ्यांना ड्रेस कोड असावा. विद्यार्थी आणि शिक्षकांना भारतीय संविधानाचा अभ्यास सक्तीचा करावा. स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची चरित्रे विद्यार्थ्यांना सांगावीत. तसेच विद्यार्थी आणि पालक-शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असावा. लोकशाही पूरक वातावरण असावे. शंका चर्चेने सोडवल्या जाव्यात. शालाबाह्य घटकापर्यंत जाण्यापूर्वी, शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशा क्रमाने शंका सोडवून घ्याव्यात. आणि ज्या शाळा-कॉलेजमध्ये संविधानाच्या मूलभूत तत्वाला बाधा आणली जाते, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागण्या उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मॉर्निंग वॉकमध्ये व्यंकाप्पा भोसले, प्रा. किशोर गायकवाड, कॉ. दिलीप पवार, कॉ. रघुनाथ कांबळे, प्रा. छाया पोवार, रवी चव्हाण, शंकर काटाळे, भरत लाटकर, प्रा. साधना देसाई, रमेश वडणगेकर, अॅड. जयंत देसाई, मीना चव्हाण, सुनंदा चव्हाण, कॉ. राजू लाटकर, अजित चव्हाण, राजेंद्र पाटील, अजय अकोलकर, रियाज मुल्ला, दिलदार मुजावर, उमेश पानसरे, संजय सुळगावे, किरण गवळी, बाबा मिठारी, संभाजी जगदाळे, रमेश वडणगेकर, अजय समुद्रे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शाहू कॉलेजपासून माझी शाळेपर्यंत मुख्य रस्ता आणि बाजूच्या गल्ल्यांमधून मॉर्निंग वॉक काढण्यात आला. समारोप शाहू कॉलेजजवळ झाला. त्यानंतर शिक्षण उपसंचालक आणि पोलीसप्रमुख यांना निवेदने देण्यात आली. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रम संपला.
शाखा : सात्रळ (जि. अहमदनगर)
अभिवादन सभा आणि पुस्तक प्रकाशन
रयत संकुल, सात्रळ, जि. अहमदनगर येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभा जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दहा पुस्तके तसेच अंनिस कार्यकर्ते प्रभाकर नानावटी, पुणे व सुकुमार मंडपे आणि प्रशांत पोतदार, सातारा यांच्या एकूण १२ पुस्तकांच्या संचाचे लोकार्पण अरुण कडू-पाटील (अध्यक्ष) व मधुकर अनाप (कार्याध्यक्ष, अहमदनगर अंनिस), प्र. प्राचार्य थोरात मॅडम, मुख्याध्यापिका निबे मॅडम व इतर सहकार्यांसमवेत करण्यात आले.
२० ऑगस्ट २०२३ डॉ. दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना मधुकर अनाप यांनी त्यांच्यासमवेत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व कार्य नमूद करताना समिती देव व धर्म याबाबत तटस्थ असून कोणताही धर्म व देवाला समितीचा विरोध नाही परंतु देवाधर्माच्या नावावर चालणारी बुवाबाजी व समाजाचे होत असलेले शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण या विरोधी समितीचा लढा असल्याचे सांगितले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या आधारे अनेक बाबा, बुवा, मांत्रिक यांचा समितीने भांडाफोड केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. चळवळीचे कार्य केवळ भूत, भानामती, बुवाबाजी विरोधी मर्यादित नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या मूल्यांसाठी संघर्ष करणारी परिवर्तनवादी संघटना आहे. यावेळी आदित्य दिवे व हमजा पठाण या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक थोरात सर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्र. प्राचार्य थोरात मॅडम यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सच्चिदानंद झावरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राशिनकर सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नालकर सर, सूर्यवंशी सर, भुसारी सर, वसावे सर, दिघे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखा : मोहने (जि. ठाणे)

निर्भय मॉर्निंग वॉक आयोजन
समाजाला विज्ञान, निर्भयता, नीती या त्रिसुत्रीचा संदेश देणार्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या घटनेस दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. अजूनही डॉक्टरांच्या मारेकरी सूत्रधारांना पकडण्यात पोलीस यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्ह्याच्यावतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ची प्रज्ञा बुद्ध विहार, मोहने गाळेगाव येथून सुरुवात झाली. चळवळीतील गीतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे समारोप झाला. यावेळी “फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर” असे लिहिलेली टोपी प्रत्येक कार्यकर्त्याने घातलेली होती.
“फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर”, “माणूस मारता येतो विचार मारता येत नाही”, “चला शिक्षणाकडे वळा, अंधश्रद्धेपासून दूर पळा”, “चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लावू सत्याचा”, “विवेकाचा आवाज बुलंद करू या”, “नका धरू अंधश्रद्धेची कास, होईल जीवन नष्ट हमखास”, “मांत्रिकाचा मंत्र, बिघडतो जीवनाचे तंत्र” इ. घोषणा देण्यात आल्या. यावेळी डी. जे. वाघमारे, अशोक वानखेडे, राजू कोळी, मधुकर कांबळे, श्रीधर रोकडे, आकाश पवार, भीमराव खेत्रे, प्रभू पगारे, विजय पायाळ, डी. के. भादवे, एन. बी. रणदिवे, मोहन मिसळे, मधुकर कांबळे, मिलिंद अहिरे, यशस वाघमारे, संविधान मोरे, प्रणित इंगळे, शुभम साळवे, तुषार पाखरे, जितु दुधावडे, विकास पैल, रोहित सोनवणे, रोहिदास गायकवाड, प्रदीप उपदेशे, किरण, प्रफुल्ल, गौतम मोरे, साहिल शेलार, संतोष निरभवणे, जितेंद्र कानडे, सुप्रिया अहिरे, पगारेताई, सरीता ससाणे, उज्ज्वला वाघमारे, सुनीता चंदनशिवे, निशा भोईर, वंदना बागुल, मालन वाघमारे, आंविदाताई वाघमारे, अश्विनी माने, सुनंदा वानखेडे असे ५० समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉक्टरांच्या १२ पुस्तिकांचा लोकार्पण शाहू शिक्षण संस्था कल्याणचे सचिव डॉ. गिरीश लटके सर व इतर कार्यकर्ते यांनी केले. लटके सर यांनी डॉ. दाभोळकर यांची भेट झाल्यानंतर ते त्यांच्या हृदयात कसे बसले हे सांगितले. मारेकर्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असा रोष व्यक्त केला.
शाखा : पेण (जि. रायगड)
अभिवादन सभा आणि पुस्तकांचे लोकार्पण
दिनांक २० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडच्यावतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी वाचनालय, पेण येथे अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी या मालिकेतील १२ पुस्तकांचं प्रकाशन प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगतपर भाषणे केली. या ठिकाणी पेण शाखेने स्टॉल लावला होता. यानंतर जिल्ह्याच्यावतीने तहसील कार्यालय, पेण येथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्याबाबत निवेदन दिले.
या सर्व कार्यक्रमात अंनिस जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, गांधी वाचनालयाचे चेअरमन अरविंद वणगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. एस. एस. कान्हेकर, पेण शाखा उपाध्यक्ष प्रा. सतीश पोरे, प्रधान सचिव एन. जे. पाटील, नागोठणे शाखा कार्याध्यक्ष विजया चव्हाण, रोहा शाखा प्रधान सचिव दिनेश शिर्के, सनय मोरे, मोहिनी गोरे, सूर्यकांत पाटील, जगदीश डंगर, आदेश पाटील, हेमंत पाटील, प्रमोद खांडेकर, संकल्प गायकवाड, हेमंत पाटील, गीता भानुषाली, सूर्यकांत पाटील, बी. यु. ढाले, धनाजी जाधव, सुभाष म्हात्रे, एम. गायकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संदेश गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन एन. जे. पाटील यांनी केले.
शाखा : मुंबई
प्रबोधनात्मक व्याख्यान
दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० वा स्मृतिदिनानिमित्त म. अंनिस मुंबई जिल्ह्याने केशवगोरे स्मारक ट्रस्ट समवेत रुईया महाविद्यालयातील डॉ. लीना केदारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ट्रस्टच्या मृणाल गोरे कला दालनात संध्याकाळी ६ वाजता ठेवला होता. व्याख्यानाचा विषय होता ‘स्त्रिया, हिंसाचाराचे लक्ष्य’ अंकिता आणि साथी यांच्या अभिवादन गीताने सभेची सुरुवात झाली. डॉ. केदारे यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. रामायण, महाभारतापासून आतापर्यंत म्हणजे मणिपूर येथे स्त्रियांवर झालेला लैंगिक अत्याचार याचे विविध दाखले देऊन पुरुषप्रधान संस्कृतीचा लेखाजोगा त्यांनी मांडला. या कार्यक्रमाला एकूण ४० जणांची उपस्थिती होती. मुंबई जिल्ह्याचा परिचय सुनीता देवलवार यांनी केला. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. रमेश सुतार यांनी केले.
कार्यक्रमानंतर ऑनलाईन मुंबई जिल्हा त्रैमासिकाचे उद्घाटन लीना केदारे यांनी केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती नितांत पेडणेकर यांनी दिली. अंकिता आणि साथीनी चळवळीची गाणी सादर केली. संगीता पांढरेने पुढाकार घेऊन हिंसेविरोधातील सामूहिक संकल्प घेतला. लांजेकरांनी पुस्तक-विक्रीची जबाबदारी सांभाळली. शुभदा निखार्गे यांनी प्रसिद्धी व व्यवस्थापन याबाबतची जबाबदारी नेहमीच्या कार्य कुशलतेने सांभाळली. प्रभा पुरोहित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शेवटी प्रियांका बर्डे हिने सर्वांचे आभार मानले.
शाखा : इस्लामपूर (जि. सांगली)
निर्भय मॉर्निंग वॉक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूर यांचेवतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी २० ऑगस्टला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध संघटना व मान्यवर यामध्ये सहभागी झाले. निर्भय मॉर्निंग वॉक, अभिवादन सभा, १२ पुस्तकांचे लोकार्पण, तहसीलदारांना तपासासाठीचे निवेदन इ. उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्याहस्ते अभिवादन करून झाली. यानंतर यल्लामा चौक – गांधी चौक – पोस्ट ऑफिस आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन सांगता झाली.
यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी आपल्या मनोगतात विचारांची लढाई विचारानेच करायची असते मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांचा खून करून त्यांचे विचार संपविता आले नाहीत हे सिद्ध झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले. कॉम्रेड धनाजी गुरव, इस्लामपूर अंनिसचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष ढगे यांचेही यावेळी मनोगत झाले. या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये डॉ. जालिंदर दिघे, शाकीर तांबोळी, अरुण कांबळे, प्रा. अशोक जाधव, प्रा. शैलजा पाटील, प्रा. अलका पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने, पत्रकार विनोद मोहिते, प्रा. सी. जे. भारसकले, विजय तिबिले, डॉ. अमित सूर्यवंशी, आविष्कार माने, हर्षित कोठावळे इत्यादी विविध समविचारी संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. “आम्ही सारे दाभोलकर, हल्लेखोरांनो हाय हाय, विवेकाचा आवाज संपणार नाही, डॉ. दाभोलकर अमर रहे, कोण म्हणतो मरून जाईल, दाभोलकर विचार कायम राहील इ. अनेक घोषणा सहभागी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी डॉ. दाभोलकर यांनी लिहिलेल्या १२ विविध पुस्तकांचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विवेकवाद, फलज्योतिष, बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन इ. अनेक विषयांवर या पुस्तकांमधून डॉ. दाभोलकरांचे विचार जनमानसात रुजविले जातील. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या डॉ. जालिंदर दिघे आणि त्यांच्या साथीदारांनी चळवळीची गीते सादर केली. इस्लामपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी दाभोलकर यांचा खून करणार्या खुन्यांना लवकर आणि योग्य तपास होऊन फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार वाळवा यांना देण्यात आले.
शाखा : सोलापूर
निर्भय मॉर्निंग वॉक
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखा व समविचारी सभा, सोलापूर यांनी २० ऑगस्टरोजी सकाळी ७ वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करून तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना २ मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहून निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते तसेच समविचारी सभा यांचे कार्यकर्ते यांनी “आम्ही सारे दाभोलकर, हल्लेखोरांनो हाय हाय, विवेकाचा आवाज संपणार नाय, डॉ. दाभोलकर अमर रहे, कोण म्हणतो मरून जाईल, दाभोलकर विचार कायम राहील इ. अनेक घोषणा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बारा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा सुद्धा प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर यांच्याहस्ते करण्यात आला. विवेक वाद, फलज्योतिष, बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन इ. अनेक विषयांवर या पुस्तकांमधून डॉ. दाभोलकरांचे विचार जनमानसात रुजविले जातील. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष प्रा. शंकर खलसोडे, कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर, सचिव ब्रह्मानंद धडके, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, उषा शहा, सरीता मोकाशी, लता ढेरे, यशवंत फडतरे, व्ही. डी. गायकवाड, निनाद शहा, आर. डी. गायकवाड, सनी दोशी, धनाजी राऊत, शकुंतला सूर्यवंशी, अभिंजली जाधव, निलेश गुरव, आसिफ नदाफ, सरफराज शेख, दत्ता चव्हाण, किशोर झेंडेकर, राम गायकवाड, राहुल जाधव, प्रसाद चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे व शिवलिंग शहाबादे यांच्यासह अनेक समविचारी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शेवटी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ “आम्ही प्रकाशबीजे, रूजवित चाललो” हे गीत गाऊन कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
शाखा : सांगोला (जि. सोलापूर)
तहसीलदारांना निवेदन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडा, अशी मागणी सांगोला, जि. सोलापूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने तहसीलदार संजय खडतरे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर निवेदनावर सांगोला अंनिसचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, विजयकुमार कोळेकर, बापूसाहेब ठोकळे, विजय माने, विनायक शिंदे, विशाल केदार, इकबाल शेख, दीपक वाघमोडे, गणेश कपडेकर, माणिक सकट, माऊली हाळे, डॉ. सीमा गायकवाड, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, रायचुरे, आर. एच. पाटील, डी. बी. बोराडे, इरफान फारुकी यांच्या स्वाक्षर्या आहेत.
शाखा : मंगळवेढा (जि. सोलापूर)
डॉ. दाभोलकर स्मृतिदिनी रक्तदान शिबिर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मंगळवेढा, एम.डी. स्पोर्ट्स, निंबोणी व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, निंबोणी व समस्त ग्रामस्थ, निंबोणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून निंबोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यांत ६० जणांनी सहभाग नोंदवला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून म्हणजे एका विचारी माणसाची अविचारी माणसांनी केलेला खून होय. माणूस संपला तरी विचार संपत नाहीत, कारण विचाराला मरण नसते ते अमर असतात. भूत उतरवणे, नरबळी, पैशांचा पाऊस, गुप्तधन अशा प्रकारची बुवाबाजी करणार्याविरोधात राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गेल्या दहा वर्षात हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत. विशेष म्हणजे या तक्रारींमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. या कायद्याबाबत शासनपातळीवरून पुरेशा प्रमाणात जनजागृतीची गरज आहे, असे मत अंनिसचे कार्यकर्ते विनायक माळी यांनी मांडले. कार्यक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प अंनिस कार्यकर्त्यांनी केला. डॉ. दाभोलकरांच्या भ्याड हत्येला दहा वर्षे पूर्ण झाली. मात्र मुख्य सूत्रधार सापडत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात आणि देशात विचारवंतांचे बळी असेच पडत राहणार का? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस स्मृतिदिन, शहीद दिन व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी एम. डी. स्पोर्ट्स निंबोणी, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे सर्व पदाधिकारी, अंनिस कार्यकर्ते व निंबोणी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. रेवनील ब्लड सेंटर, सांगोला यांनी मोलाचे सहकार्य केले.
शाखा : तासगाव (जि. सांगली)

निर्भय मॉर्निंग वॉक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त निर्भय मॉनिग वॉक आणि देहदान संकल्प पत्र वाटप करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना पकडून शिक्षा व्हावी, यासाठी तासगाव अंनिस शाखेच्यावतीने अहिंसात्मक मार्गाने आंदोलन गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू आहेत, हा लढा न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार असल्याच्या निर्धाराने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी कमांडो करिअर अॅकॅडमीचे संचालक जाधव सर व त्यांचे विद्यार्थी, राष्ट्रसेवा दल, नूतन परिट स्वराज्य पक्ष जिल्हा अध्यक्ष शशिकांत डागे, वंचित बहुजन आघाडी, शिवाजी गुळवे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव, काँग्रेसचे सचिन पाटील, शरद शेळके, मनोज पाटील, डॉ. सतीश पवार, अंनिस शाखेच्या अध्यक्षा छायाताई खरमाटे, उपाध्यक्ष हेमलता बागवडे, संचिता सावंत रवींद्र सावंत, शंकर पाटील, अंकुश जाधव, विकास यादव, राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे उपस्थित होते.
दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या दोषींवर कारवाई केली जात असताना मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटपणे फिरत आहे, त्याला लवकरात लवकर अटक होऊन शिक्षा व्हावी यासाठी आपण जमलो आहोत, अशी आंदोलने न्याय मिळेपर्यंत करावी लागणार आहेत, ती करत राहू. दाभोलकरांच्या विचारांचा जागर जनमाणसात रूजविण्यासाठी काम करत राहू, हीच खरी आदरांजली ठरेल, असे मत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी मांडले. यावेळी देहदान संकल्पपत्राचे वाटप करताना पंचवीस कार्यकर्त्यांनी आपला देहदानाचा संकल्प घेतला त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
वैभव गुरव, अविनाश घोडके, समीर कोळी, सुधीर नलवडे, सचिन जाधव प्रा. वासुदेव गुरव, ज्योती गुरव, शिवांश गुरव, ऋतुजा खोत, वैष्णवी यादव, विशाल खाडे सर यांनी सहयोग दिले. सूत्रसंचलन अंनिस कार्याध्यक्ष अमर खोत यांनी केले. आभार अंनिस जिल्हाध्यक्ष भाई बाबूराव जाधव यांनी मानले.
शाखा : अहमदनगर

स्नेहालय येथे पुस्तकांचे लोकार्पण…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित झालेल्या १२ पुस्तकांचे लोकार्पण स्नेहालय, अहमदनगर येथे करण्यात आले.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, अहमदनगर अंनिस कार्याध्यक्ष मधुकर अनाप, स्नेहालयच्या रत्ना शिंदे, स्नेहालय येथील विद्यार्थिनी, स्नेहालयचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते श्याम असावा व राज्य कार्यकारणी सदस्य प्रशांत पोतदार उपस्थित होते.
शाखा : बेलापूर (नवी मुंबई)

अभिवादन सभा आणि पुस्तकांचे लोकार्पण
शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या १० वा स्मृतिदिनानिमित्ताने २० ऑगस्टरोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर व नेरुळ शाखाच्यावतीने कॉ. बीटी रणदिवे ग्रंथालय, आग्रोळी, गाव बेलापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिवादन सभेची सुरुवात बेलापूर शाखेचे विजय खरात यांनी “आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो…” या गाण्याने केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अधिक जोमाने पुढे घेऊन जाणं हीच शहीद डॉ. दाभोलकरांना खरीखुरी आदरांजली ठरेल, असे विचार मांडले.
या अभिवादन सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट या शिक्षक संघटनेचे नेते मा. शिवाजी कुल्लाळ सर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांच्या १२ पुस्तिकांचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात विवेकाची चळवळ जिवंत ठेवून अधिक प्रभावी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मरियम ढवळे यांनी अंधश्रद्धांचा महिलांवर होणारा परिणाम नमूद करून अंधश्रद्धेची चळवळ ही स्त्रीमुक्ती चळवळीसोबत संलग्न आहे, असे मत मांडले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी शहीद दाभोलकर यांचा खून होऊन १० वर्षे झाली पण अजून खरे सूत्रधार सापडले नाहीत हे नमूद करून अंनिसची चळवळ ही निव्वळ अंधश्रद्धा निर्मूलन यापुरतीच मर्यादित नसून ही संविधान मूल्यांची लढाई आहे आणि यासाठीच आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे हे नमूद केले. अभिवादन सभेचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर पवार सर यांनी अध्यक्षीय भाषण करताना व्यक्ती मारता येतो पण विचार कधीच संपवता येत नाही हे नमूद करून आज डॉ. दाभोलकर यांचा खून होऊन १० वर्षे झाली, तरीही अंनिसची चळवळ अधिक जोमाने पुढे चालली आहे हे ठळकपणे मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश साळुंखे सर यांनी केले तर आभार मनीषा खरात यांनी मानले. कार्यक्रमाला बेलापूर व नेरुळ शाखेच्या कार्यकर्त्यांसोबत नवी मुंबईतील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस “विवेकाचा आवाज बुलंद करा” “शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे” “फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर” या घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
शाखा : परभणी

‘निर्भय मॉर्निंग वॉक’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यासाठी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? याबाबत शासनाला विचारणा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे राजगोपालचारी उद्यान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत समविचारी संघटना, तरुण व तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विवेकाचा आवाज बुलंद करू या, फुले- शाहू- आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर, लढेंगे-जितेंगे, दाभोलकरांचे मारेकरी पकडले, सूत्रधार केव्हा पकडणार? अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या समारोपप्रसंगी भाषणे झाली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंजाजी कांबळे यांनी करून ‘डॉ. दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ’ या गीतातून दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. यानंतर डॉ. सुनील जाधव, अॅड. माधुरी क्षीरसागर, नितीन सावंत, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, आप्पाराव मोरताटे, प्रा. रफिक शेख, प्रा. प्रल्हाद मोरे, प्रा. सावित्री चिताडे, डॉ. रवींद्र मानवतकर यांची समायोचित भाषणे करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मुख्य सूत्रधार यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जगदीश नाईक, प्रा. लिंगायत माणिक, डॉ. एन. व्ही. सिंगापुरे, डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, घन:श्याम साळवे, बाबासाहेब धबाले, राहुल वाकळे, प्रकाश शिंगाडे व अंनिसच्या सर्व पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
शाखा : रत्नागिरी

पुस्तकांचे लोकार्पण
दिनांक २० ऑगस्ट २०२३ ला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दहा वर्षे पूर्ण झाली. डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त म.अंनिसने आयोजित केलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी अंतर्गत बारा पुस्तकांच्या प्रकाशन प्रदर्शन व विक्री या उपक्रमाचे आयोजन रत्नागिरी शहर शाखेच्यावतीने करण्यात आले. रत्नागिरी व रेल्वे सुरक्षा बल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या श्रीमती उषाताई सुर्वे (वय ९७) यांच्याहस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल व रत्नागिरी रेल्वे स्टेशन अशा दोन ठिकाणी रत्नागिरी शहर शाखेच्यावतीने लावण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी नागरिकांनी पुस्तक खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमासाठी रत्नागिरी शहर शाखेच्यावतीने विनोद वायंगणकर, अतुल तांबट, वल्लभ वणजू, राधा वणजू उपस्थित होते.
शाखा : नाशिक
पुस्तक विक्री
नाशिकमधील दाभोलकर विवेक व्याख्यान मालेत (२० ऑगस्ट २०२३) शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी, सर्व पुरोगामी संस्था संघटना एकत्र येऊन सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी आपल्या अं. नि. वार्तापत्राच्या (१०+२) पुस्तिकांचे एकूण ६० (साठ) संचांची विक्री झाली.
शाखा : गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)
निर्भय मॉर्निंग वॉक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त म. अंनिस गडहिंग्लज शहर आणि तालुका शाखेच्या वतीने शहरात निर्भय मॉर्निंग वॉक हा उपक्रम राबवून शहीद डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. या दरम्यान शहीद डॉ. दाभोलकर अमर रहे, विवेकाचा आवाज बुलंद करूया, डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रा. प्रकाश भोईटे, एम. डी. येल्लुरकर, डॉ. संजीवनी पाटील, प्रा. अशपाक मकानदार, प्रा. सुभाष कोरे, सिद्धार्थ बन्ने यांची मनोगते झाली. शेवटी आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. या मॉर्निंग वॉक रॅलीमध्ये दत्तात्रय वाघमारे, आशपाक मकानदार, प्रा. योगेश पाटील, अशोकराव मोहिते, प्रा. विजय काळे, डॉ.संजीवनी पाटील, उषा गणपतराव मोहिते, माधवी जाधव, वंचित महिला बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्पना प्रकाश कांबळे, गीता सुधाकर पाटील, लक्ष्मण सुतार, सूरज म्हेत्री, सिद्धार्थ बन्ने, आर. बी. कांबळे, प्रा. अशोक पट्टणशेट्टी, इकबाल सनदी, संतान बार्देसकर तसेच बाळासाहेब मुल्ला, प्रा. पी. डी. पाटील, आप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य साताप्पा कांबळे, गणपतराव पाटोळे, तानाजी कुरळे, स्वर्णलता गोविलकर, अरूणा शिंदे, रेखा पोतदार, उज्वला दळवी, उर्मिला कदम, विजय दावणे, सुमन सुर्यवंशी, श्री गावडे, अशपाक किल्लेदार, रमजान अत्तार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाखा : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर)
निर्भय मॉर्निंग वॉक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मतिदिनी जयसिंगपुरात निर्भय मॉर्निंग वॉक करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणांमुळे परिसर दणाणून गेला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी, राष्ट्र सेवा दल, लाल बावटा कामगार युनियन तसेच सर्व पुरोगामी संघटना यांचेवतीने दसरा चौक, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, नगरपालिका ते क्रांती चौक अशा मार्गाने रॅली काढून डॉ. दाभोळकर यांचा खून करणार्या सनातनी धर्मांध प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला. या खुनाच्या मागे जबाबदार असणार्या यंत्रणेचा बंदोबस्त करून शासनाने कायद्याचे आणि संविधानाचे राज्य असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहनही करण्यात आले. अनेक मान्यवरांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी डॉ. चिदानंद आवळेकर, बाबासाहेब नदाफ, डॉ. महावीर अक्कोळे, कॉ. रघुनाथ देशींगे, डॉ. अजित विरनाळे, प्रा. शांताराम कांबळे, महेश घोटणे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कार्यकर्ते फंचू कुंभोजकर, ए. एस. पाटील, अशोक शिरगुप्पे, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, डॉ. अतिक पटेल, सुनील बनसोडे, तुषार घाटगे, वाय. एम. चव्हाण, बाळगोंडा पाटील, खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, संतोष जुगळे, श्रीकांत चव्हाण, महावीर कडाले, आप्पा बंडगर, खुतबुद्दिन दानवाडे, महावीर व्हसाले, मीरासाहेब कांबळे तसेच पुरोगामी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
शाखा : वसई विरार (जि. पालघर)
अभिवादन फेरी
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, प्रभावी वक्ते, लेखक, विज्ञाननिष्ठ सुधारक, राजा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त उत्कृष्ट खेळाडू असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी रविवार सायंकाळी ०४:३० वाजता अंनिस वसई, विरार शाखा तसेच सर्व समविचारी संघटनेतर्फे विरार पश्चिम येथे र्शींशपळपस ुरश्रज्ञ चे आयोजन विरार बस डेपोपासून जकात नाक्यापर्यंत करण्यात आले होते.
त्यानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर राष्ट्र सेवादल वसई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डी.वाय.एफ.आय. आंबेडकर विचारांच्या संघटना सारख्या समविचारी संघटनांनी सहभाग घेतला. अनेक कार्यकर्त्यांनी, नामवंत मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या समाजप्रबोधक विचारांचे फलक घेऊन घोषणा देत ही सायंकाळची फेरी पुढे सरकली. डॉ. दाभोलकरलिखित १२ पुस्तकांच्या संचाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या स्मृतीस आदराजंली देऊन अभिवादन करण्यात आले.
शाखा : कवठेमहांकाळ (जि. सांगली)
निर्भय मॉर्निंग वॉक आणि पुस्तकांचे लोकार्पण
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवठेमहांकाळ शाखेच्यावतीने २० ऑगस्टरोजी सकाळी ७ वाजता कवठेमहांकाळ शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. तहसील कार्यालयापासून मॉर्निंग वॉकला सुरुवात करण्यात आली. अंबिका मंदिर, धुळगाव रोड, युववाणी चौक, कुंभार गल्ली, शिवाजी पेठमार्गे डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना फाशी झालीच पाहिजे, डॉ नरेंद्र दाभोलकर जिंदाबाद, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मारले.. त्यांचा विवेकाचा आवाज कसा माराल….अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
गोळ्या मारून माणसं मरतात.. विचार मरत नाहीत.. जादूटोणा विरोधी कायद्याच्या भीतीने अंगात येणे बंद झाले.. असे भाई दिगंबर कांबळे यांनी आपल्या मनोगतात मांडले. अंनिसच्या वतीने अनेक उपक्रम कवठेमहांकाळ तालुक्यात केले जातात, त्यामध्ये हिंगणगाव येथील महिलेचे जटा निर्मूलन, इरळी येथील आर्यनचा मांत्रिकाच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूबाबत मांत्रिकावर कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आला. मणिपूर येथे झालेल्या अत्याचाराचा निषेध, ३१ डिसेंबर रोजी दारू नको, दूध प्या, अंनिसचे प्रबोधन शिबिर एकदिवसीय असे अनेक सामाजिक उपक्रम केले जातात, असे अंनिसचे कवठेमहांकाळ शाखेचे कार्याध्यक्ष सचिन करगणे यांनी सांगितले.
डॉ. सुनीता माळी यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. प्रा. दादासाहेब ढेरे यांनी या चळवळीमध्ये महिला व युवकांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रा. परमानंद भोसले यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रा. बाबासाहेब बेंडे-पाटील यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांना मारणार्या व्यक्ती वेगळ्या असल्या तरी त्यामागचा सूत्रधार एकच असल्याचे सांगितले.
येणार्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर गाववार करण्यात यावा, असे मत विश्वास साखरे यांनी मांडले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचे लोकार्पण डॉ. सुनीता माळी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. सुभाष कोष्टी, डॉ. संतोष कुंभारकर, प्रा. संदीप माने, प्रा. विनोद कांबळे, मधुकर पाटील, प्रथमेश माने, सचिन सोनवणे, विशाल काटे, ओंकार सोनवणे, विक्रांत लोखंडे, यशवर्धन करगणे, आदर्श करगणे, उत्कर्ष करगणे इ. उपस्थित होते.
शाखा : लातूर
जिल्हाधिकार्यांना निवेदन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूर शहर शाखेच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागील सूत्रधार पकडावे, अन्यथा देशातील विवेकवादी, विचारवंत कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचे निवेदन समितीतर्फे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश घादगिने, शहर शाखेचे कार्याध्यक्ष पंकज जैस्वाल, प्रधान सचिव प्रा. एम. बी. पठाण, राज्याचे वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाचे वसंत टेकाळे, रमेश माने, राज्य सदस्य प्रशिक्षण विभाग, राजकुमार दाभाडे, रमेश शंकरराव भोयरेकर, डॉ. का. ल. सलगर, रमेश हनमंते इत्यादी उपस्थित होते.
शाखा : सफाळे (जि. पालघर)
डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांचे लोकार्पण
सफाळे, ता. व जिल्हा पालघर येथे डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांच्या संचाचे रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता तरुणांच्या सभेमध्ये लोकार्पण करण्यात आले. सफाळे शाखेचे अध्यक्ष डॉ. विलास पोसम व सर्वोदयी कार्यकर्ते मा. जयंत दीवाण यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी सर्वांनी डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने करायची सामुदायिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे आयोजन पालघर जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक भाते यांनी केले.
शाखा : नागपूर
निर्भय मार्निंग वॉक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त “निर्भय मार्निंग वॉक ” काढून महा. अंनिसच्या नागपुरातील सर्वच शाखांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले. रविवार दि.२० ऑगस्टला सकाळी हे “निर्भय मार्निंग वॉक” संविधान चौक ते झिरो माईल व परत संविधान चौक असे काढण्यात आले. नागपूर शहरातील सर्व शाखां व त्यांचे कार्यकर्ते बॅनरसहित जयघोष करीत यात सामील झाले होते. या मार्निंग वॉकचा समापण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर संविधान चौकात करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दै. बहुजन सौरभच्या संपादक संध्या राजुरकर, स्तंभलेखक विलास गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी राजुरकर मॅडम म्हणाल्या, अजूनही डॉ. दाभोळकरांच्या मारेकर्यांचा मुख्य सूत्रधार शोधण्यात शासनाला यश आले नाही. अशा जातीवादी व सनातनी प्रवृत्तीपासून बहुजनांनी जागृत राहण्याची गरज आहे. तर विलास गजभिये म्हणाले, समतेचा विचार अधिक तीव्र करण्यासाठी पाच विविध जाती-धर्माच्या लोकांना समतेच्या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे. मंचकावर रा. का. सदस्य रामभाऊ डोंगरे व कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे उपस्थित होते. समापण कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनील भगत तर आभार प्रा. पुष्पा घोडके यांनी व्यक्त केले. या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये देवानंदजी बडगे, चंद्रशेखर मेश्राम, गौतम पाटील, डॉ. सुनील भगत, विजय पारधी, प्रा. पुष्पा घोडके, डॉ. विकास होले, दिप्ती नाईक, वर्षा सहारे, देवयानी भगत, मंगला गाणार, सुषमा शेवडे, विजया ठाकरे, शीला डोंगरे, शोभा पाटील, सुनीता गजभे, अरविंद तायडे, शशिकांत बनकर, वसंता मोहिले, शीला ढोणे, नरेश महाजन, वसंत गेडामकर, खुशालराव इंगोले, भगवान राव, अॅड. नागदेवे, सतीश उके, देवेंद्र लांजेवार, कमलाकर मेश्राम, चंदा मोटघरे, बेबीनंदा रामटेके, सहयोग मित्रपरिवारचे रमेश ढवळे, सुनीता ढवळे व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महा. अंनिस नागपूर जिल्ह्यातर्फे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांना निवेदन
या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी केले. तर याप्रसंगी कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे, डॉ. विकास होले, भगवंत राव, इंगोले साहेब, दिप्ती नाईक, विजया ठाकरे, चंद्रशेखर मेश्राम, नरेश महाजन, मित्र परिवाराचे अध्यक्ष रमेश ढवळे व सचिव लहाणू बंसोडजी इत्यादी उपस्थित होते.
शाखा : मल्हारपेठ (जि. सातारा)
अभिवादन सभा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मल्हारपेठ व सह्याद्री वाचनालय, मल्हारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस अभिवादन बाळासाहेब शेटे, डी. के. पवार यांनी केले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ग्रंथाचे प्रदर्शन घेतले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदीप देसाई, भैयासाहेब मुलाणी, विठ्ठल चव्हाण यांनी केले.
समाजातील सर्वसामान्य घटकातील जीवघेण्या अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना व युवा वर्गाने पुढाकार घेऊन विवेकी विचारांचा जागर करून विवेकाचा आवाज बुलंद करून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील अभिवादन केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अं. नि. स. चे मल्हारपेठ शाखा कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांनी केले.
यावेळी गाणी समाज प्रबोधनाची व चमत्कार सादरीकरणही केले. सौ. धनश्री भागवत यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवन चरित्राविषयी मनोगत व्यक्त केले. सौ. शुभांगी पवार यांनी डॉ. दाभोलकरांचे साहित्य व लिखाण याबद्दल विचार मांडले. ग्रंथ प्रदर्शन संयोजन सौ. रुपाली शेटे यांनी केले. यावेळी जितेंद्र म्हस्के, प्रतीक पवार, चिमाजी पवार तसेच सह्याद्री वाचनालयाचे पदाधिकारी, संचालक, वाचक तसेच मल्हारपेठ विभागातील सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
शाखा : भद्रावती (जि. चंद्रपूर)
अभिवादन सभा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही त्यांना अटक का केली जात नाही. तपास यंत्रणाकडून संदिग्धता का ठेवली जाते, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, रवींद्र तिराणिक यांनी उपस्थित केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री साई आयटीआय (सेमिनार हॉल) भद्रावती येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अंनिस तालुकाध्यक्ष डॉ. राहुल साळवे, मुनेश्वर गौरकार, सचिव प्रा. अमोल ठाकरे, कार्याध्यक्ष शारदाताई खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करीत मार्गदर्शनपर विचार व्यक्त करीत अभिवादन केले.
अभिवादन व्यक्त करीत असताना येणारी आव्हाने पेलवण्यासाठी युवा पिढीने सक्षम असण्याची गरज आहे, असे मत अभियांत्रिकी क्षेत्रातील दीक्षा खोब्रागडे, अशोक जवादे, सुमेध खोब्रागडे, रवींद्र वानखेडे, मनोज मोडक, श्रीधर भगत, अनिता भजभुजे, मुक्ताताई पेटकर यांनी मांडले. प्रसंगी सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून प्रा. नामदेव रामटेके यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रचंड कार्याची सविस्तर भूमिका विषद केली.
मूल (जि. चंद्रपूर)
अभिवादन सभा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तालुका शाखा मूलचे वतीने दिनांक २०/८/२०२३ ला संध्या. ७.०० वा. वॉर्ड नं. १६ येथील बुद्ध विहार मूल येथे महा. अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा दहावा स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा. अंनिस तालुका शाखा मूलचे वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिलीप गेडाम, महा. अनिस तालुका मूल हे होते.
याप्रसंगी बोलतांना मा. दिलीप गेडामसाहेब म्हणाले, आज दहा वर्ष होऊनही शहीद दाभोलकर साहेबांच्या खुनामागच्या सूत्रधाराला पकडण्यात आलेले नाही. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. इंजि. विनायक रामटेके उपाध्यक्ष महा. अनिस मूल, जिल्हा महिला प्रतिनिधी मा. काजल दुधे, मा. मनोहर दुर्गे अंनिस पदाधिकारी, मा. पूजा रामटेके सामाजिक कार्यकर्त्या, मा. सुवेसिनी ताई डोरलिकर तसेच माता-भगिनी व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शाखा : अंबाजोगाई (जि. बीड)
निर्भय मॉर्निंग वॉक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंबाजोगाई यांच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी अंबाजोगाई शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. बस स्टँडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीचा समारोप करण्यात आला.
सदर मॉर्निग वॉकसाठी डॉ. सुरेश खुरसाले, संतराम कराड, हेमंत धानोरकर, देशमुख मॅडम, अवचार मॅडम, डॉ. चव्हाण, श्री. तिडके माजी न्यायाधीश, प्रदीप चव्हाण, अजय बुरांडे, सविता शेटे, शैलजा बरूरे मॅडम इत्यादी समविचारी व अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शाखा : नांदेड
निर्भय मॉर्निंग वॉक आणि पुस्तिकांचे लोकार्पण
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे महाराष्ट्राच्या बुद्धीवादी विवेकवादी चळवळीसाठीचे योगदान विसरता येणार नाही. समाजाला अंधश्रद्धेकडून वैज्ञानिक दृष्टीकडे घेऊन जाण्याचा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. आज समाजातील वातावरण मुद्दामहून अविवेकी, धर्मांध, जात्यांध करण्याचे षडयंत्र केले जात आहे. अशावेळी विवेकवादाचा जागर अधिक टोकदार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मॉर्निंग वॉक (शिव मंदिर ते सांगवी नाका) प्रसंगी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्याहस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित बारा पुस्तिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध नाटककार व विचारवंत प्रा. दत्ता भगत होते.
यावेळी प्रा. दत्ता भगत म्हणाले, अंधश्रद्धेविरुद्धची लढाई ही वर्गवर्चस्व वादाविरुद्धची लढाई आहे. महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, कॉम्रेड पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून समाजावर आपलेच वर्चस्व राहावे याच भावनेतून झाले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चिकित्सक वृत्तीशिवाय अंधश्रद्धा जाणार नाहीत. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. प्रा. डॉ. लेनीना, कॉ. उज्ज्वला पडलवाड, कॉ. अॅड. प्रदीप नागपूरकर (जिल्हाध्यक्ष, अंनिस) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. आदिनाथ इंगोले यांनी परिवर्तनाचे गीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सम्राट हटकर (राज्य कार्यकारणी सदस्य, अंनिस) यांनी केले तर नितीन ऐंगडे (प्रधान सचिव, अंनिस) यांनी मानले.
भोकर, जिल्हा नांदेड
भोकर शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये अंनिसचे अध्यक्ष लक्ष्मण हिरे, प्रधान सचिव दिलीप पोत्रे, शिवाजी गायकवाड आदीसह अंनिसचे कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
बिलोली, जि. नांदेड
बिलोली शाखेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे, अध्यक्ष शंकर महाजन, कार्याध्यक्ष अशोक वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी यलगंद्रे, दीपक कुमार कासराळीकर, आर. डी. ईबीतवार, शिवराज वाघमारे व अंनिसचे कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
नायगाव, जि. नांदेड
नायगाव तालुका अंधश्रदा निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार यांना डॉ. दाभोलकर यांच्या खुनामागील सुत्रधारांना अटक करण्यात यावी, यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या बोटचेपे धोरणाचा निषेध करून डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, खुनाच्या सूत्रधाराचा शोध घेण्यास हलगर्जीपणा करणार्या शासनाचा धिक्कार असो, अंनिस जिंदाबाद…. अशा घोषणा देण्यात आल्या.
दि. २० ऑगस्टरोजी सकाळी सहा वाजता नायगाव ते शेळगाव रोडवरील राजर्षी शाहू नगरपासून साईतीर्थ मंगल कार्यालयपर्यंत निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये अंनिसचे पदाधिकारी व इतर अनेक व्यक्ती सहभागी झाले होते. या निवेदनावर अंनिस नायगाव तालुका अध्यक्ष ह. स. खंडगावकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर गड्डमवार, प्रधान सचिव भा. ग. मोरे व सा. रा. जाधव यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मुखेड, जि. नांदेड
मुखेड शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार कोण व त्यांना कधी पकडणार? अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अंनिसचे अध्यक्ष दत्ता तुमवाड, कार्याध्यक्ष हसनाळकर, प्रधान सचिव अॅड. संजय भारदे आदींसह अंनिसचे कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
शाखा : ठाणे शहर
विवेक जागर फेरी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर कार्यकर्त्यांनी ठाणे नगर परिसरात विवेकी जागर फेरी काढली. या जागर फेरीत शासनाने मारेकर्यांना लवकरात लवकर पकडावे, असे आवाहन केले. दाभोलकरांचे वैज्ञानिक दृष्टिकोनवादी विचार रुजवणार्या घोषणा जागर फेरीमध्ये दिल्या गेल्या. जागर फेरी कोर्ट नाका ठाणे येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाली आणि ठाणे मंडई मार्गे ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम येथील आंबेडकर पुतळा येथे निषेध व्यक्त करून डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांना लवकरात लवकर पकडण्याचे आवाहन केले.
अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदें सोबत विविध समविचारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते जगदीशभाई खैरालिया, पर्यावरणवादी Eco friendly movement चे डॉक्टर अशोक, धनाजी सुरोसे, सिद्धांत चासकर, कार्यकर्ते शुभदा चव्हाण, राजेंद्र चव्हाण, हेमा रामचंद्रन, पुष्पाताई तापोळे, अथर्व लिपारे, अजित डफळे, अशोक चव्हाण, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार, अनिल शाळिग्राम, म्यूज फाउंडेशनचे निशांत बंगेरा तसेच ज्योती कांबळी, अजय भोसले, समीर शिंदे, संजय महाजन अंनिस अध्यक्ष, ठाणे शहर, असे सुमारे ४० समविचारी कार्यकर्ते विवेकी जागर फेरीस उपस्थित होते.
या सोबतच डॉक्टरांच्या १० लघु पुस्तिका रुपात आलेल्या आवृत्तीचे ठाणे रेल्वेस्थानक परिसरात जनतेच्या उपस्थितीत प्रकाशन माई वंदना शिंदे आणि मान्यवर सदस्यांच्या हस्ते केले. काही पुस्तके प्रवाशांनी तिथेच विकत घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. ठाणे नगर पोलिस अधिकारी यांचे उत्तम सहकार्याने जागर फेरी झाली. ठाणे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ यशस्वी विवेकी जागर फेरीचा समारोप झाला.
शाखा : बेळगाव
दाभोलकर स्मृतिदिनी व्याख्यान
देव आणि दानवाच्या कल्पना मानवाने तयार केल्या आहेत. अज्ञान, अंधश्रद्धेमुळे समाज मागे पडत आहे. समाजात खरी सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉ. दाभोलकर यांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येकाने चिकित्सक होऊन विवेकाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन प्रा. सुभाष कोरे (गडहिंग्लज) यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुभाष ओऊळकर अध्यक्षस्थानी होते. शंकर चौगुले यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. निला आपटे यांनी गीत सादर केले. यावेळी प्रा. प्रकाश भोईटे (गडहिंग्लज) यांनी विविध चमत्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद घेतली. त्यानंतर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना आनंद चिट्टी यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आभार जोतिबा जाधव यांनी मानले. प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
शाखा : चिपळूण
तहसीलदारांना निवेदन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी निखिल भोसले, रमाकांत सकपाळ, अविनाश आखाडे, सुजाता महाडिक, संजय कदम, महेंद्र इंदुलकर, संजीव अणेराव, मल्हार इंदुलकर, अक्षता शर्णे, सुनीता गांधी, विनायक होमकळस, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, दीपक महाडिक, जाफर गोठे, क्षितिज पाथरे आदी उपस्थित होते.
शाखा : कराड (जि. सातारा)

दाभोलकरांना मारले; पण त्यांचे विचार अमर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
“समाजाने वैज्ञानिक, मानवतावाद दृष्टिकोन स्वीकारणे हे ४२ व्या घटना दुरुस्तीत सांगितले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही मंजूर करून घेण्यात यश मिळवले. ज्या मनोवृत्तीने गांधींचा खून केला त्याच मनोवृत्तीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून केला. दाभोलकरांना मारले परंतु त्यांच्या विचारांना मारता येत नाही, ते आजही जिवंत आहेत,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तिकांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अंनिस कराड शाखेचे समन्वयक बाळ देवधर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “खरंतर एकविसाव्या शतकात वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने पोथीवाद हे आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे. परंतु जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय कायदा म्हणून समोर आला, तेव्हा मात्र काही लोकांनी याला कडाडून विरोध केला. हा कायदा हिंदू धर्मविरोधी असल्याचा कांगावा केला गेला. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर सातत्याने कायद्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. कायदा झाला असला तरी आजही समाजात अघोरी घटना घडताना दिसत आहेत.”
डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. दाभोलकरांनी उभं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वेचले. अंधश्रद्धेला, भोंदूगिरीला संपवण्याचा ध्यास घेतलेले डॉ. दाभोलकर आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार ते हजारो कार्यकर्त्यांच्या मनात तेवत ठेवून गेले. कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सुधीर कुंभार, अशोक पाटील, इंद्रजित चव्हाण, बाळासाहेब मोहिते, विलासराव जाधव, प्रा. भगवानराव खोत, विद्यार्थी उपस्थित होते.
शाखा : येवला (जि. नाशिक)
निर्भय मॉर्निंग वॉक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दलाच्या येवला शाखेतर्फे शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत वॉकमध्ये शेकडो येवलेकर सहभागी झाले होते. हाती प्रबोधनपर फलक घेऊन निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. ‘आम्ही विवेकाचे वारसदार, दाभोलकरांच्या खुन्यांना अटक झालीच पाहिजे,’ ‘लोकशाही- धर्मनिरपेक्ष आणि विज्ञाननिष्ठ विचार समाजात रुजलाच पाहिजे,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकाळी येवला-विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रा. निळकंठ पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दलातर्फे रामनाथ पाटील, पंडित मढवई, नवनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, प्राचार्य भाऊसाहेब गमे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. निळकंठ पाटील, डॉ. अजय विभांडिक, बाबासाहेब कोकाटे, चांगदेव मुंढे, पुरुषोत्तम पाटील, कानिफ मढवई, जी. एल. जाधव, रामनाथ पाटील, कल्पना माने, योगिता घोरपडे, दौलत वाणी, शिवाजी शिंदे, हेमंत पाटील, संतोष कोकाटे, गोरख खराटे, आप्पासाहेब शिंदे रामदास भवर, भाऊसाहेब पूरकर, सुकदेव आहेर, उत्तम लंड, शिवाजी शिंदे, निकीता चांदेकर, महेंद्र विधे, मयूर जाधव, देवीदास पगारे, उत्तम मढवई, शैलेंद्र वाघ, रमेश मढवई योगेश शिंदे, कुणाल चव्हाण, कुणाल कोकाटे, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.
शाखा : हिंगणघाट (जि. वर्धा)
अभिवादन सभा
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार व मास्टर माईंड मोकळेच असून दहा वर्ष होऊनसुद्धा खरे सूत्रधार मोकाट आहेत. याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगणघाट शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला. हिंगणघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अंनिस तालुका कार्याध्यक्षा राजश्री बांबोळे, संस्कृती विभागप्रमुख अस्मिता भगत, महिला विभागप्रमुख कल्पना वागदे, सदस्य मोनाली फुलझेले, वंदना थुल, मीरा फुलमाळी, प्रमिला कुंभारे, लीला धुल, सिंधू दखणे, भाग्यश्री नगराळे, शारदा जामुनकर, योजना वासेकर, लीना नगराळे, वैशाली वासेकर, सुषमा पाटील, अश्विनी निमसरकार, सुचिता कांबळे, संगीता लभाने, मोनिका पाटील, राशी मेश्राम, वंदना भगत, सुरेखा मेश्राम, तन्मय वासेकर इत्यादी कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शाखा : वर्धा
निर्भय मॉर्निंग वॉक
वर्धा अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी वर्धा शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉ. दाभोलकर यांच्या खून घडवून आणणार्या खर्या सूत्रधारांना अटक करीत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन शांतीच्या मार्गाने सुरू राहील. या करीता शासनाने त्वरित कार्यवाही करावी, याबाबतचे निवेदन शासनास पाठविण्यात आले. ही निर्भय मॉर्निंग रॅली बजाज चौकातून सकाळी निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन अभिवादन करण्यात आले. या मॉर्निंग वॉकमध्ये वर्धा येथील अंनिसचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे, अॅड. पूजा जाधव, जिल्हा प्रधान सचिव सुरेश रंगारी, जानराव नागमोते, प्रकाश बनसोड, जोत्स्ना वासनिक, उषा कांबळे, अनिल भोंगाडे, दशरथ गवळी, राजेश वाघमारे, प्रियदर्शना भेले, शीतल बनसोड, महेश दुबे, विलास नागदेवते सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन जोत्स्ना वासनिक यांनी केले. अनिल भोंगाडे यांनी डॉ. दाभोलकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आभार दशरथ गवळी यांनी मानले.
शाखा : आटपाडी (जि. सांगली)

पुस्तकांचे लोकार्पण
आटपाडी येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा १० वा स्मृतिदिन त्यांच्या पुस्तक प्रकाशनाने पार पडला. अंनिस शाखा आटपाडी व मोफत वाचनालय आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. दाभोळकर यांच्या बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, स्त्रिया व अंधश्रद्धा निर्मूलन अशा दहा पुस्तकं वाचनाने विद्यार्थी भविष्यात विवेकी होतील. घरोघरी दाभोलकर यांचे विचार पोहचणे गरजेचे आहे. भवानी विद्यालयातील शनिवारी होणारा विज्ञान जिज्ञासा उपक्रम त्यातील प्रयोग, चमत्कार, याचा विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन भविष्यात बाळगण्यास फायदाच झाला, असे प्रतिपादन आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
यावेळी जय अशोक लवटे याला चेन्नई येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. तसेच अंनिसचे कार्यकर्ते नाना पिसे यांनी गेली १० वर्षे शाळा, गणेश मंडळ, यात्रा अशा ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, चमत्कार सादरीकरण करून प्रबोधन करीत असलेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बीडीएस बँकचे उपाध्यक्ष जे. जे. देशपांडे, माजी उपसभापती रुपेशकुमार पाटील, वाचनालयचे अध्यक्ष सी. आर. काकडे, वैशाली कांबळे, सृष्टी डिगोळे, आर्यन तोरणे, सिद्धार्थ वाघमारे, श्रेया डिगोळे, रितेश लांडगे, कृष्णा हरिहर व अथर्व डिगोळे यांना दाभोलकरांची पुस्तके अंनिस शाखेमार्फत मोफत देण्यात आली.
या कार्यक्रमास स. नि. पाटील, एम. बी. कदम, दत्तात्रय स्वामी, आबा सागर, पी. जी. नामदास, एम. बी. गायकवाड, एम. जे. मरगळे, अशोक कदम, रोहिणी डिगोळे, शिंपी मॅडम, दिनेश पुस्तक देशमुख, निलेश डिगोळे, शिलप्रभा भिंगे, डॉ. जीवन पाटील, लक्ष्मण चोथे, नैनिता भिंगे, एम. बी. कदम, सुनील भिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाखा : पालघर
मूक निदर्शने
दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला १० वर्षे पूर्ण झालीत. त्यांचे मारेकरी सापडले पण त्यांच्या खुनामागील सूत्रधाराला अजून व्यवस्थेला पकडण्यात यश मिळाले नाही. त्याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पालघर शाखेतर्फे हुतात्मा चौक पालघर येथे मूक निदर्शन करण्यात आली.
सदर कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रो. गढरी, अॅड. सुरेश महाडिक, जगदीश राऊत, शीतल मेहेर तामोरे, भावेश संखे, अजित दळवी, भंडारे सर, श्रीकांत गुरव, मनिष तामोरे, अॅड. ज्योती ठाकूर, श्री. दानिश शेख, जनता दलाचे आणि एकलव्य सामाजिक संस्था, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते श्री. विद्याधर ठाकूर, श्री. प्रकाश लव्हेकर, कु. अंकिता पाटील, ज्येष्ठ छाया चित्रकार श्री. निर्भय पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सेक्रेटरी मा. परदेशी सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. पौर्णिमा मेहर, पत्रकार श्री. रमाकांत पाटील, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्री. मनोहर दांडेकर, श्री. सलीम पटेल, आप्पा पाटील, असद चुनावाला व त्यांचे सहकारी मूक निषेध निदर्शन कार्यक्रमात सहभागी झाले.
शाखा : मुरूम (जि. लातूर)
अभिवादन सभा
शहीद डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्री. माधवराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूम (जि. लातूर) येथे पाटील महाविद्यालयात रविवारी (ता.२०) रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्याहस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. दिनकर बिराजदार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. विलास खडके, डॉ. नरसिंग कदम, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुदीप ढंगे, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. राजेंद्र गणापुरे, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. दीपाली स्वामी, प्रा. लक्ष्मण पवार, मल्लू स्वामी, आनंद वाघमोडे, अमोल कटके, किशोर कारभारी, दिलीप घाटे, चंदकांत पुजारी आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुजित मटकरी यांनी मानले.
शाखा : रहिमतपूर (जि. सातारा)
कीर्तनातून प्रबोधन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर आणि मायबोली फाउंडेशन सुरली यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्ट २०२३ रोजी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कीर्तन स्वरूपात व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रबोधन हे जर कीर्तन स्वरूपात असेल तर समाज ते ऐकून समजून घेतोय याची प्रचिती आली.
व्याख्यानासाठी सत्यशोधक बहुजन वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, हभप भगवानदास शास्त्री, घुगे महाराज उपस्थित होते. महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज बहुजनांना का आहे हे सांगताना संत गाडगे महाराज पासून ते शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरपर्यंत सर्व पुरोगामी लोकांनी केलेले योगदान सांगितले. महाराज म्हणाले, त्यांनी एका दाभोलकरांना मारले पण त्या जागी आता १ लाख दाभोलकर उभे राहिलेत, त्यांचे विचार आता दुपटीने घरा घरात पोचत आहेत. ह.भ.प. भगवानदास शास्त्री घुगे महाराज हे पुरोगामी विद्रोही चळवळीचे कार्यकर्ते आहेत. वय वर्ष ७६ पण अजून प्रबोधन करायला कधीही कोठेही तयार असतात. कसल्याही मानधनाची अपेक्षा नाही. त्यांनी त्यांची बरीच विद्रोही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रवीण माने, पूजा माने, नगमा शेख, चंद्रहार माने, शोभा माने, शिवाजी शिंदे, शंकर कणसे, रोहिणी कणसे, मधूकर माने, आशालता माने, रोहित संकपाळ, अवनीश माने, सीताराम माने, कॉम्रेड सुभाष मदने, विजय जाधव, बाळासाहेब हुंडे आणि इतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसेच रहिमतपूर मधील नागरिक हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने (काका) यांनी बहुमोल सहकार्य केले.
शाखा : भोर (जि. पुणे)

तहसीलदारांना निवेदन
ऑगस्ट २०२३ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनी महाराष्ट्र अंनिस भोर शाखेमार्फत त्यांचे अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणार्या सूत्रधारांचा शोध लावून त्यांना शिक्षा करा, असे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोरच्यावतीने मा. जिल्हा अधिकारी, पुणे, मा. तहसीलदार, भोर व मा. उपविभागीय अधिकारी, भोर यांना देण्यात आले. यावेळी डॉ. अरुण बुरांडे, सुरेश शाह, गजानन झगडे हे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या पुस्तिकांचे १२० संच भोर शाखेच्या सदस्यांनी विकत घेतले. त्यांपैकी ३० ते ४० संचांचे भोर तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वाटप करून डॉक्टरांचे आणि अंनिसचे विचार त्या शाळांपर्यंत पोचवण्याचे नियोजन शाखेने केले आहे. यासाठी धनंजय कोठावळे, सविता कोठावळे, विवेक पोळ, सूरज अडसूळ प्रयत्न करत आहेत.
शाखा : खेड (जि. रत्नागिरी)

तहसीलदारांना निवेदन
खेड जि. रत्नागिरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागच्या सूत्रधारांना पकडावे, या मागणीची निवेदन खेड अंनिसच्या वतीने मा. तहसीलदार आणि मा. पोलीस निरीक्षक खेड यांना देण्यात आले. यावेळी शाखेचे अध्यक्ष डी. एस. पाष्टे, कार्याध्यक्ष प्रशांत पावस्कर, सचिव लोंढे, सदस्य राजपाल भिडे, रोहिणी अवघडे, मोहन चव्हाण, नेत्रदीप तांबे उपस्थित होते.
सांगली येथे डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांचे लोकार्पण
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांची जोड दिल्यामुळे हे काम अत्यंत प्रभावीपणे जनमानसात रुजले गेले, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी केले. त्या नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभेच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने २० ऑगस्टरोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने रोटरी क्लब सभागृह विश्रामबाग येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी डॉ. दाभोलकरांच्या बारा पुस्तकांचे लोकार्पण सांगलीतील विविध क्षेत्रातील बारा महिलांच्या हस्ते केले गेले. यामध्ये डॉ. लता देशपांडे, प्रा. रेवती हातकणंगलेकर, उषा आर्डे, प्रा. आशा कराडकर, डॉ. नीलिमा शिंदे-म्हैशाळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार, डॉ. सोनिया कस्तुरे, अॅड. तेजस्विनी सूर्यवंशी, गीता ठाकर, प्रा. राणी यादव, डॉ. स्मिता मुलाणी, उज्ज्वला परांजपे, ज्योती आदाटे यांचा समावेश होता. यावेळी बोलताना प्रा. भवाळकर म्हणाल्या, लोकांचे प्रबोधन करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अत्यंत संयमीत भाषा वापरली होती. लोककलेच्या, लोकपरंपरेच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन पूर्वपार सुरू आहे. लोकसाहित्यातील गोष्टींचा, संतविचारांचा आधार घेऊन प्रबोधन केले तर समाज ते लवकर स्वीकारेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. दाभोलकरांच्या सहअध्यायी डॉ. लता देशपांडे म्हणाल्या की, मिरज मेडिकल कॉलेज येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि मी एकत्र शिकायला होतो. मेडिकल कॉलेज येथे त्यांनी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन उभा केले होते. महाराष्ट्रातील पहिले खासगी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे सुरू झाल्यानंतर त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठे आंदोलन उभारले. त्याचबरोबर फायनल वर्ष पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी सांगली येथील गांधी पुतळ्याजवळ सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठा मोर्चा काढला आणि उपोषण केले. विद्यार्थी दशेतच डॉ. दाभोलकरांचे संघटन कौशल्य आम्ही जवळून अनुभवले आहे. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये मान होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शेजारी अनेक वर्ष राहणार्या प्रा. रेवती हातकणंगलेकर म्हणाल्या की, सांगली विलिंग्डन कॉलेजच्या आवारात दाभोलकर आणि हातकणंगलेकर ही कुटुंबे अनेक वर्षे शेजारी राहत होती. कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य असणारे देवदत्त दाभोलकर हे गांधीवादी होते. मोठ्या भावांकडेच डॉ. नरेंद्र दाभोलकर शिक्षणासाठी राहिल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गांधी विचाराचा प्रभाव पडला होता. प्रा. आशा कराडकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या या पुस्तकातून जिवंत आहेत, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार म्हणाल्या की, जिजाऊ ब्रिगेड ही महिलांच्यामधील चुकीच्या रुढी, परंपरा बंद करण्यासाठी काम करते. तेच काम अंनिसही करते. आपण एकत्र काम केले तर समाजातील चुकीच्या रूढी, परंपरा लवकर दूर होतील.
याप्रसंगी उज्ज्वला परांजपे, उषा आर्डे, डॉ. सोनिया कस्तुरे, डॉ. स्मिता मुलाणी, ज्योती अदाटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल थोरात, सूत्रसंचालन आशा धनाले तर आभार डॉ. संजय निटवे यांनी मांडले. फारूक गवंडी, चंद्रकांत वंजाळे, प्रा. अमित ठाकर, डॉ. सविता अक्कोळे, श्रीकृष्ण कोरे, धनश्री साळुंखे, त्रिशला शहा, स्वाती वंजाळे, सुहास येरोडकर, सुहास पवार उपस्थित होते.