‘नागपूर अंनिस’ने केला भानामतीचा भांडाफोड

-

‘महा.अंनिस’च्या उत्तर नागपूर शाखेने नागपूर शहरातील बारसे नगर, पाचपावली परिसरातील दोन भगिनींच्या घरावर लगातार तीन दिवसांपासून दगड-गोटे येण्याच्या प्रकाराचा भांडाफोड केला आहे.

कोणीतरी अनोळखी व्यक्ती घरावर दगडफेक करित असल्याची तक्रार या भगिनींनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली, शेजारच्यांकडे विचारपूस केली. पण दगड-धोंडे फेकणार्‍यांचा सुगावा काही केल्या लागत नव्हता. त्यामुळे हा प्रकार भानामतीचा असून कोणीतरी अज्ञात शक्ती किंवा भूतपिशाच दगडफेक करीत आहे, अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली व लोक भयभीत झाले. शेवटी पीडितांनी हताश होऊन ‘महा अंनिस’कडे तक्रार केली.

‘महा अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी त्वरित कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे व उत्तर नागपूर शाखा कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली. ही टीम स्थानिक नागरिकांच्या मदतीने निरीक्षण करत असतानाच दोन-तीनदा दगडांचा वर्षाव झाला.

‘महा अंनिस’च्या टीमने काही महत्त्वाच्या टिप्स देऊन परिसरातील युवावर्गाला पाळत ठेवायला सांगितले. सापळ्याप्रमाणे दुसर्‍याच दिवशी सायंकाळी सहाच्या दरम्यान या युवा टीमने दगडं फेकणार्‍या व्यक्तीला रंगेहाथ पकडले व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला. शक्तीपेक्षा युक्ती कामी आली. याकामी सयाल महाजन, सौरव मासुरकर, श्रेयस वासनिक, आश्विन बागडे, उज्वल बागडे, स्वरीत वासनिक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ‘महा अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पीडित परिवाराचे यथोचित समुपदेशन केले व पाचपावली ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षकांशी चर्चा करून प्रकरण निकाली काढले.यावेळी ‘महा अंनिस’चे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश राठौड, रामभाऊ डोंगरे, चित्तरंजन चौरे, अरुण भगत, वंदना लांजेवार, वसंत गेडामकर, गौतम मघाडे व चंदा मोटघरे उपस्थित होत्या.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]