-
महा. अंनिस ग्रंथदिंडी आणि महा. अंनिस पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ‘रजिया सुलताना’ यांची मुलाखत आणि त्यांच्या ‘रंग जीवनाचे’ आणि ‘भिकार्यांच्या जगात’ या दोन पुस्तकांचं प्रकाशन असा कार्यक्रम १८ ऑगस्ट ला ग्रंथदिंडीचे पेंडसे काका यांच्या घरी संपन्न झाला. लेखक कवी श्रीनिवास गडकरी आणि परीवर्तनच्या समुपदेशक रेश्मा कचरे यांनी रजिया सुलताना यांची मुलाखत घेतली. वैचारिक, सामजिक, जातिधर्म, स्त्रीपुरूष समानता, रजिया मॅडमचे विचार.. अनुभव.. प्रश्न उत्तरे अशी सर्वांगीण विचारांची घुसळण झाली. यावेळी पुणे शाखा अध्यक्ष वसंत कदम आणि इंद्रजित देसाई इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.