-
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे लेखक, डाव्या चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी आणि समिक्षक कॉ.सुभाष थोरात (पुणे) यांचे २६ जून रोजी दुःखद निधन झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक मोठा आधारस्तंभ, मित्र, हितचिंतक आणि पाठीराखा गमावला आहे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळाच्या वतीने विनम्र आदरांजली.
त्यांच्या कार्याचा वेध घेणारा लेख पुढील अंकात प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक
