इस्लाममधील चिकित्सेच्या परंपरेला बळ द्यावे – सरफराज अहमद

-

भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर अंनिसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये विशेष व्याख्यान.

इस्लाममधील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या, चिकित्सेच्या परंपरेला बळ देण्याची कधी नव्हे, एवढी आज गरज आहे. ते बळ देण्याअगोदर ती परंपरा आपण मुळातून समजून घेतली पाहिजे. कोणत्याही धर्माचे मूल्य व्यवस्था आणि कर्मकांड असे दोन भाग असतात. अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल तर त्या धर्मातील कर्मकांडाला विरोध करून मूल्य व्यवस्थेसोबत आपण जोडून घेणे आवश्यक आहे. सर्व धर्मातील चांगल्या माणसांनी सर्व धर्मातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढायची गरज आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सोलापूर येथे राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते, त्यामध्ये ते बोलत होते.

इतिहास अभ्यासक सरफराज अहमद म्हणाले की, इस्लामने धार्मिक कर्मकांडे, रूढी परंपरांना कडाडून विरोध केला आहे. पण त्याची पुरेशी नोंद घेतली गेलेली नाही. मूर्तिपूजा आणि स्त्री भ्रूणहत्या विरोध करण्याची भूमिका प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी घेतली. इस्लाममध्ये परिवर्तन होत आले आहे. जुन्या रूढी-परंपरा, चालीरीती मोडून नव्याकडे इस्लाम ने प्रवास केला आहे. त्यामुळे इस्लाम परिवर्तनीय आहे.

सरफराज अहमद पुढे म्हणाले की, सध्याच्या काळामध्ये मध्ययुगीन इतिहासाचा वापर हा मुस्लिमांचे खच्चीकरण करण्यासाठी केला जात आहे. सरंजामी मुस्लीम राजे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी भारतात आले होते. त्यातले काही वाईट होते, तर काही चांगले. ते सोईने वागत होते. पण त्यांना सामान्य भारतीय मुसलमानांना जोडून त्याचे विकृतीकरण करण्यात येत आहे. कट्टर धर्मवादी राजकारण हे सामान्य जनतेला नेहमीच नुकसान कारक असते. ते सामान्य मुसलमानांनी नाकारायला हवे. तसेच त्यांनी देखील या चिकित्सेच्या विचाराशी जोडून घ्यायला हवे असे देखील ते म्हणाले.

इतिहासासंबधी अधिक भाष्य करताना सरफराज अहमद म्हणाले की, घडून गेलेली घटना म्हणजे इतिहास असतो. तो जसा आहे तसा समजून घेणे आवश्यक असते. पण तो सोईस्कर समजून घेतला आहे. पण इतक्यावर न थांबता त्याचा वापर स्वतःचे उदारीकरण व इतरांचे खच्चीकरण करण्यासाठी वापरला जातो.

अंनिसचे राज्य कमिटी सदस्य फारूख गवंडी यांनी प्रास्ताविकात अंनिस ही फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन करणारी संघटना हा आक्षेप धादांत खोटा आहे, हे पुरावे देऊन नमूद केले. अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्ता निशा भोसले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. हेमंत शिंदे यांनी स्वागत तर अण्णा कडलास्कर आभार मानले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]