‘अंनिस’मुळे भोंदूबाबाकडून फसवणूक झालेल्या व्यक्तीस साडेपाच लाख रुपये मिळाले परत

संदेश गायकवाड -

संदीप बबन फाळके या इसमाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते संदेश गायकवाड यांना फोन करून सांगितले की, नटराजन नायर उर्फ प्रेमसाई महाराज या बाबाने धनासुर दैत्यची शती ट्रान्स्फर करण्यासाठी माझ्याकडून ५,६०,००० रुपये (पाच लाख साठ हजार रुपये) घेतले. पण मला त्याने ना शक्ती ट्रान्स्फर केली ना पैसे परत दिले. सदर प्रकरण २३/३/२१ ला घडलं होतं. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संदेश गायकवाड यांनी संदीप फाळके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली व पोलिसात तक्रार करायला सांगितली.

प्रकरण जुने आहे म्हणून पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. संदेश गायकवाड यांनी ताबडतोब सदर इन्स्पेटरला फोन करून, तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यानंतर तक्रार दाखल करून घेतली गेली. दोन दिवसानंतर संदीप फाळके यांनी फोन करून कळवले की, त्यांच्या अकाउंटवर ५,६०,०००/- नटराजन नायर उर्फ प्रेमसाईने जमा केले आहेत. संदीप फाळके यांनी संदेश गायकवाड ह्यांचे व्यक्तिशः आभार मानले आणि आभाराचे पत्रही पाठवले. जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे २०२१ च्या बुवाबाजीच्या प्रकरणातील फसवणूक झालेल्या व्यक्तीस इतया वर्षांनी न्याय मिळाला. सदर प्रकरण महाड तालुयातील नवेनगर भागातील आहे. पोलिसांनी आणि सामान्य जनतेने देखील जादूटोणा कायदा समजून घेण्याची गरज असल्याचे मत संदेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

– संदेश गायकवाड, पेण, जि.रायगड


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]