-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, अंनिस वार्तापत्राचे शतकवीर पुरस्काराने सन्मानित, क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ माजी जिल्हा उपाध्यक्ष मा. व्ही. सी. भुयागळे साहेब, (रा. कन्नड, जि. छ.संभाजीनगर) यांचे मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते गेली ३५ वर्षे सक्रिय काम करत होते. आजारपणाच्या काळातसुद्धा ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यस्तरीय कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाढीसाठी ते नेहमी सक्रिय असत. भुयागळे साहेबांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन!
भुयागळे परिवाराचे सांत्वन करण्यात आले. त्याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे कार्यकारी सदस्य मिलिंद देशमुख पुणे, नंदिनी जाधव पुणे, भगवान रणदिवे सातारा, शंकर कणसे सातारा यांच्यासह जालना जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण शंकर बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संजय हेरकर, प्रभाकर आरसूड यांनी भुयागळे परिवाराची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रा. आर. जी. लहाने कन्नड यांनी आदरांजली सभेचे सूत्रसंचालन केले. भुयागळे यांच्या पश्चात पत्नी शशिकला विठ्ठलराव भुयागळे, मुले, संजय, सुनील, संतोष, सतीश, मुलगी मंगल संपत आल्हाट, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
– महाराष्ट्र. अं.नि.स.
