जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा

अंनिवा -

28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. म.अंनिस महिला सहभाग विभागाने या दिवशी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून संवाद साधला. ही संवाद सभा सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव यांच्या पुढाकाराने आयोजित केली.

या कार्यक्रमाची सुरुवात पेणच्या डॉ. सावनी गोडबोले यांनी गायलेल्या सखी आली माझ्या दारी या पाळीसंदर्भातील गीताने करण्यात आली. प्रास्ताविकात सुशीला मुंडे यांनी या दिवसाचे महत्त्व आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश स्पष्ट केला. मासिक पाळी चक्राची शास्त्रीय माहिती उषा शहा, राज्य महिला स. वि. कार्यवाह यांनी ’स्त्री जननसंस्था आणि स्त्री बीजकोषचा छेद’ या आकृतीच्या सहाय्याने सविस्तरपणे दिली. सुरेखा भापकर, राज्य सरचिटणीस यांनी पाळी संदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा यांची माहिती दिली आणि हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी कोणता विचार करावा, हेही सांगितले.

अल्पसंख्याक समाजातील पाळीविषयीच्या विचारधारेची माहिती रूक्साना मुल्ला, राज्य म. स. वि. सहकार्यवाह यांनी दिली. ख्रिश्चन, मुस्लिम, जैन व बौद्ध या सर्वच धर्मांतील विचार त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने मांडले. पाळीसंदर्भात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन सारिका डेहनकर, राज्य म. स. वि. सहकार्यवाह यांनी केले. कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी या कार्यक्रमात विशेष सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. शालिनी ओक, राज्य निमंत्रक यांनी सुनबाई पूजेला बसली, देव म्हणे विटाळला हे गीत सादर केले.

आभार किरण जाधव, राज्य वै. जा. प्रकल्प वि. सहकार्यवाह यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. माधुरी झाडे, प्रधान सचिव, वर्धा यांनी ओघवत्या भाषेत केले. या संवाद सभेत जिल्हा, शाखा म. स. विभाग कार्यवाह व सहकार्यवाह यांनी मोठा सहभाग नोंदविला.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]