पुण्यात मिश्रा बाबाच्या आश्रमामध्ये मुलींवर अत्याचार

-

राधामोहन मिश्रा (वय ५९, रा. उबाळेनगर, पुणे) असे नराधम भोंदू बाबाचे नाव आहे. त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५८) या दोघांसह अन्य सहा महिलांविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार खराडी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट रचणे तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००९ ते २०२६ दरम्यानच्या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला उच्चशिक्षित असून, येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. मॉडर्न गुरुकुल असे या आश्रमाचे नाव होते.स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा महिलेचे वडील गेले होते. कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांची भोंदूबाबा मिश्राशी ओळख झाली. त्यावेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे महिलेचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. त्यांना महाराज हे दिव्य पुरूष आहेत, असे सांगितले होते.

भोंदूबाबाच्या मॉडर्न गुरुकुलाचा सुरुवातीचा सगळा खर्च महिलेच्या वडिलांनीच केला. महिलादेखील मिश्राच्या आश्रमात राहत होती. दरम्यानच्या काळात त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. २०१० मध्ये महिला आणि तिच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावातून पुण्यात स्थलांतरित होण्यास भाग पाडले. २०१३ ते २०१६ दरम्यानच्या काळात मिश्राने महिलेचा छळ केला, असे फिर्यादीत नमूद आहे.  या बाबाने शारीरिक व मानसिक छळाबरोबरच महिलेला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडून तिची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. महिलेच्या आई-वडिलांची भोंदूवर मोठी श्रद्धा असल्याने त्याचा गैरफायदा घेत तिला त्यांच्या नजरेत खोटे ठरवले. अखेर १७ वर्षांपासून भोंदूच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने दुसर्‍या राज्यात असलेले आपले घर गाठले. आई-वडिलांना विश्वासात घेऊन या भोंदूची कुंडली त्यांच्यासमोर मांडल्यानंतर शेवटी महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. आरोपींकडून जप्त केलेल्या लॅपटॉप मधील पुरावे अजून मिळायचे आहेत. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १२ लॅपटॉप, १ टॅब, ११ मोबाईल, १९ हार्ड डिस्क, साडे सहा लाखांची रोकड DVD २३ पेन ड्राईव्ह, दहा काडतुसे, १५ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. पुढील तांत्रिक तपस करून पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]