कोरोनामुक्तीसाठी महामृत्युंजय पठणाचे आवाहन, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णतः विसंगत

-

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी कोरोनामुक्तीसाठी लोकांनी घराघरांतून सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘महामृत्युंजय’चे पठण करावे, असे जाहीर आवाहन प्रसारमाध्यमांतून केलेले आहे. त्यांचे हे आवाहन, सद्यःपरिस्थितीत पूर्णपणे अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरविणारे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये कायद्याचे उल्लंघन करणारे ठरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा जीवघेण्या संकटमय परिस्थितीमध्ये लोकांना जपजाप्य, पठण, प्रार्थना करून कोरोनापासून मुक्ती मिळते, असे सांगणे हे पूर्णपणे कार्यकारणभावाचा अभाव असलेले विधान आहे. तसेच ते भारतीय संविधानातील भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असणार्‍या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णपणे विसंगत आहे.

सद्यःस्थितीत शासनाने कोरोनासंदर्भात अफवा पसरवणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे परिपत्रक प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यामुळे सुमित्राताईंच्या या आवाहनामुळे या कायद्याचे उल्लंघन होत आहे. एका विशिष्ट विचारसरणीच्या अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या उपचारांसंदर्भात यापूर्वीही जाहीर चुकीची विधानं केलेली आहेत; तसेच काही ज्योतिषी, बाबा-बुवा यांनी, दूवावाले, आशीर्वादीत पाणीवाले, असे अवैज्ञानिक दावे केले होते. त्यांच्यावरही कारवाई व्हावी, म्हणून महाराष्ट्र अंनिसने प्रशासनाला कळविले होते, तरीही असे अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पसरवणारे, चुकीचे दावे पुन्हा-पुन्हा केले जातात, म्हणून याबाबत माननीय न्यायालयांनी ’सुमोटो’ अधिकाराचा वापर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी नम्र विनंती महाराष्ट्र अंनिसतर्फे कार्याध्यक्ष मा.अविनाश पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

लोकसभेचे प्रमुखपद भूषविलेल्या सुमित्राताई महाजन यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीवर विश्वास ठेवून लोक त्यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित किंवा कोरोनाच्या भीतीने ग्रस्त असलेल्या व्यक्ती महामृत्युंजय पठण, प्रार्थना करण्यात वेळ घालवतील, तर अशा व्यक्ती योग्य त्या वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहतील आणि स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात आणतील, याचाही गांभीर्याने विचार करावा. म्हणून माननीय सुमित्राताई महाजनांनी आपले कोरोनामुक्तीसाठी महामृत्युंजयाचे पठण, हे आवाहन मागे घेत असल्याचे जाहीर करावे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]