अंनिस ग्रंथदिंडीचे पुरस्कार जाहीर

-

महा. अंनिस तर्फे ग्रंथदिंडी हा उपक्रम पुण्याचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वास पेंडसे यांच्या संकल्पनेतून राज्यभर यशस्वी राबवला जातो. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पुरोगामी, वैज्ञानिक विचारांचे साहित्य प्रचार, विक्री यातून जावे ही यामागची तळमळ. मा. विश्वास पेंडसेसरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या चारचाकी गाडीत फोल्डिंगची टेबल ठेऊन पुण्याच्या नाक्या नाक्यावर या फिरत्या ग्रंथदिंडी रुपातील गाडीतून अक्षरशः लाखो रुपयांची पुस्तकं विकली. सध्या ही गाडी अंनिस बारामतीकडे आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून दरवर्षी याच ग्रंथदिंडीमार्फत दरवर्षी दहा नवोदित कार्यकर्त्यांना ग्रंथदिंडी प्रेरणा पुरस्काराने येत्या ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी नांदेड राज्य कार्यकारिणीत सन्मानित केले. यावर्षी हे दहा पुरस्कार विजेते आहेत आपले हे साथी.

) अंब्रोस मायकल चेट्टियार ठाणे शहर

) डॉ. दीपक शिवराम माने गुहागर जिल्हा रत्नागिरी

) सोनाली इस्माईल शेख जालना

) निशांत प्रमोद म्हेत्रे बाणेर, पुणे

) उदय एन. देशमुख डोंबिवली, ठाणे

) गजानन सोमण्णा बिराजदार चिंबळी खेड, पुणे

) संजय कळके कोल्हापूर

) अशोक सोपान जाधव चिंचवड, पुणे

) डॉ. अस्मिता विलास बालगावकर सोलापूर

१०) विशाल विलास बारवकर चाकण, पुणे.

या पुरस्कार विजेत्या निवडीसाठी आपले ज्येष्ठ सहकारी डॉ. अरुण बुरांडे, डॉ. रवी वरखेडकर, अलका जाधव आणि विश्वास पेंडसे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे आपण जाहीर अभिनंदन करुया.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]