अरुण कुमार -
अनेक दिवसांपर्यंत
रंगवलेल्या होत्या
घरांच्या भिंती
हिरव्या, पांढर्या आणि
केशरी रंगात
त्या भिंती
ज्यांनी एकत्र येऊन बहाल केलं होतं
घराला घरपण
मागील काही वर्षांमध्ये
आज एकेका भिंतीवरती
कब्जा प्रत्येक रंगाचा
हाणामारी
दंगेखोरी
झुंडबळी
तिरस्कृत टोमणे
यांनी सजलेल्या भिंतींनी
त्रस्त झालेला मी
रंगवू पाहातो आहे
सगळ्या भिंती
निळ्या रंगात
म्हणजे घर वाचवू शकेन
मूळ हिंदी कविता – अरुण कुमार
मराठी अनुवाद – भरत यादव
संपर्क – 9890140500
yadavbh515gmail.com
