आहेराची रक्कम देणगी म्हणून दिली

संजय बारी -

जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे उषा पाटील व दिवंगत. भीमराव म्हस्के यांचा मुलगा बिरसा आणि रसिका यांचा आंतरजातीय विवाह नुकताच संपन्न झाला. अनिष्ट रूढी परंपरांना, मानपान, देणंघेणं आशा सर्व गोष्टींना फाटा देऊन, आगळ्या वेगळ्या पद्धतीने सोहळा संपन्न झाला .प्रथम वधू वरांनी सामाजिक समता निर्माण करणार्‍या बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माल्यार्पण केले.वधू वरांचा परिचय करून देण्यात आला.वधुवरांनी सहजीवनाची घोषणा घेतली, मान्यवरांची आशीर्वादपर भाषणं झालीत.सहभोजन झाले.

उषा पाटील ह्या, श्रमिक दलित, वंचितांसाठी मागील 30/40 वर्षांपासून परिसरात कार्य करीत आहेत. त्याच्या प्रेमापोटी आहेरास मनाई करणे अशक्य झाले, तेव्हा आलेला आहेर सामाजिक कामास देण्याचे त्यांनी ठरवले आणि पुढील संस्थांना देणगी स्वरूपात आहेर देण्यात आला.

1) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

2) सानेगुरुजी स्मारक, अमळनेर

3) गीताई सेवा केंद्र, पुसद

4) मानवी एकता संधान, मुंबई,

5) जनमुक्ती संघर्ष वाहिनी, मुंबई,

6) वर्धिष्णू संस्था, जळगांव.

यावेळी डॉ.सुगंत बरंठ, जेष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, डॉ अरुणा चौधरी, प्राचार्या, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय भूसावळ, सुधाकर जाधव, जेष्ठ राजकीय विश्लेषक, प्रतिभा शिंदे-लोकसंघर्ष मोर्चा, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे कुंजीबिहारी रावत, नितीन तळेले, निर्मला फालक, शैला सावंत इ. कार्यकर्ते उपस्थित होते.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]