श्रीपाल ललवाणी -
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्यातर्फे ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नवीन वर्ष साजरे करताना व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. यावेळी युवकांनी दारू पिऊन व फटाके वाजवून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्ष साजरे करू नये व त्याऐवजी दूध पिऊन साजरे करावे, असे आवाहन केले गेले. यावेळी जवळपास 20 लिटर गरम मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना संबंधित नियमांचे पालन करत विविध नागरिकांनी याचा आनंद घेतला. यावेळी शहराध्यक्ष श्रीपाल ललवाणी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, वसंत कदम, सुरेश सपकाळ, दीपक जाधव, नितीन लेले, राहुल माने हे उपस्थित होते. यासाठी ज्ञानेश्वर शिंदे यांची बहुमोल मदत मिळाली.
– श्रीपाल ललवाणी, पुणे
