-
पालघर परिसरातील ज्येष्ठ समाज सेवक राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जेष्ठ नागरिक संघ सारख्या विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असणारे धडाडीचे कार्यकर्ते वसंतराव भास्कर करवीर उर्फ आप्पा (तारापूर) यांचे शनिवार दिनांक 7 मार्च 2020 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. वसंत करवीर यांनी उद्योग, आरोग्य, राजकारण, समाजकारण, नाटक, साहित्य या सारख्या अनेक क्षेत्रात भरीव कार्य केले व आपले जीवन समृद्ध केले.सुमारे दहा वर्षांपूर्वीच वसंतरावांनी देहदानाचा फॉर्म भरला होता, त्यांचे निधन वलसाड येथील कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये झाले, तेथील उमिया सोशल ट्रस्टचे श्री. अशोकभाई पटेल आणि सहकारी यांच्या सहकार्यामुळे वसंतरावांचे नेत्रदान आरएनसी हॉस्पिटलच्या सहकार्याने झाले त्यानंतर त्यांचा देह वलसाड येथील ॠएठचड मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला. मअंनिस व राष्ट्र सेवा दल तर्फे अवयवदान व देहदान अभियान पालघर परिसरात चालविले जाते, या अभियानांतर्गत करवीर कुटुंबियांतर्फे वडिलांचे नेत्रदान व देहदानाची ही पहिली घटना आहे, यातून प्रेरणा घेऊन इतरांनीही नेत्रदान, देहदान, अवयवदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांचे पुत्र व मअंनिसचे कार्यकर्ते अनिल करवीर यांनी केले.