राहुल थोरात -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा शहीद दिन २० ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करण्याची सुरुवात कशी झाली त्याची गोष्ट…
All india People’s Science Network (AIPSN) ही देशभरातील विज्ञान प्रचार प्रसारासाठी काम करणार्या संघटनांचे फेडरेशन आहे. वेगवेगळ्या राज्यातील विज्ञान प्रचार प्रसारासाठी काम करणार्या संघटना या अखझडछ शी संलग्न आहेत. या AIPSN शी पश्चिम बंगालमधील विज्ञान प्रचार-प्रसाराचे काम करणारी ‘पश्चिम बंगाल विज्ञान मंच’ ही संघटना जोडलेली आहे. AIPSN च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. अरुण बो यांच्या भेटीत त्यांना पहिलाच प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा होता, तो प्रश्न राहुलने विचारला.
“डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन ऑल इंडिया पातळीवर राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कसा झाला आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली याबाबत सांगाल का?”
प्रा. अरुण बो सांगू लागले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर आम्हाला थोडेबहुत माहीत होते. पण २० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी म्हणवून घेणार्या महाराष्ट्रामध्ये एका मवाळवादी कार्यकर्त्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संविधानिक आग्रह धरणार्या विवेकवाद्याचा निर्घृण खून होतो हा आम्हाला बसलेला धका होता. आम्ही तातडीने आमच्या संघटनेची बैठक आयोजित करून संध्याकाळी रविंद्र सदन, नंदन, कलकत्ता येथे निषेध रॅली आणि सभा घेतली. या निषेध सभेत कोलकाता शहरातील अनेक प्रागतिक विचारांचे लोक सहभागी झाले होते. सर्वांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. परंतु त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे मला मनोमन वाटत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणार्या एका लढवय्याचा खून केला जातो, कारण ते करीत असलेले काम. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही पुढील वर्षी म्हणजे २० ऑगस्ट २०१४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहीद दिनापासून पश्चिम बंगाल विज्ञान मंच तर्फे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करू लागलो.
जानेवारी २०१८ मध्ये ओरिसाची राजधानी भुवनेश्वर येथे अखझडछ शी देशभरातील संलग्न संघटनांची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये ०१ नोव्हेंबर जो डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी एकत्रितपणे राष्ट्रीय स्तरावर उपक्रम राबविण्याबाबत चर्चा सुरू होती. शेवटी ०१ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करण्याबाबत एकमत होत होते. परंतु हा दिवस ०१ नोव्हेंबर ऐवजी २० ऑगस्ट या शहीद दिनी घेणेबाबत पश्चिम बंगाल विज्ञानवादी संघटनेतर्फे मी आग्रह धरला. याचे कारण सुस्पष्ट होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार पसरविण्याचे काम हजारो लोक करीत आहेत. हे मारेकर्यांना ठणकावून सांगण्यासाठी ‘शहीद दिवस २० ऑगस्ट’ च योग्य होता. ‘ढहशू लरप ज्ञळश्रश्र चरप, र्लीीं लरप’ीं खवशरी’ हे सांगत असताना प्रा. अरुण बो सरांचा स्वर थोडा उंच झाला होता. सविस्तर चर्चेनंतर २० ऑगस्ट रोजीच देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करण्याचा निर्णय झाला.
पश्चिम बंगाल विज्ञान मंच तर ऑगस्ट २०१४ पासूनच हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करीत आहेच. आता ऑगस्ट २०१८ पासून मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगाल सोबतच संपूर्ण भारतभरात हा दिवस साजरा होत आहे. फक्त व्याख्यानांपासून सुरुवात झालेले कार्यक्रम आता रॅली, सेमिनार, चमत्कार सादरीकरण, विज्ञान प्रदर्शन, पुस्तक विक्री, आकाश निरीक्षण इत्यादी माध्यमातून जवळपास २० राज्यांत हा दिवस साजरा होत आहे. एकट्या पश्चिम बंगाल विज्ञान मंचच्या राज्यभरातील २८० पेक्षा जास्त शाखा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करीत आहेत.
– फारुक गवंडी, राहुल थोरात