मातांच्या आजारांचा संक्षिप्त इतिहास

भरत यादव - 9890140500

आपल्या देहाच्या व्याकरणाला
समजून घेतल्याविना आमच्या मातांची
लग्नं लावून देण्यात आली;
तारुण्याच्या उंबरठ्याच्या अल्याड असूनही
त्या आपल्याच भाराने थरथरत उभ्या राहिल्या
आम्हाला आपल्या गर्भात घेऊन;
तिने आमच्यासाठी मिसळली
आपल्या स्तनात खडीसाखर

मात्र आम्ही आपल्या मातांचे तितके कधी नाही बनलो, जितकी ती आमची बनली
ज्या स्तनांनी आम्हाला आयुष्यभरासाठी बळकटी दिली
त्याचं नाव घेण्यातही आम्हास शरम वाटू लागली
आणि त्यात वाढत राहिलेल्या कुठल्याशा जखमेपासून अनभिज्ञ माता निद्राधीन होत राहिल्या देवाच्या भरवशावर.

आम्ही आमच्या मातांचे तितके कधी नाही बनलो, जितकी ती आमची बनली
आम्ही शिकून-सवरून मोठे झालो
परंतु विज्ञानाच्या अंधारात माता फक्त आजारी पडली
तिच्या स्तनाच्या गाठी रक्त ओकत राहिल्या आणि आम्ही त्याच्यावर बोलणेदेखील लज्जास्पद मानले.

या माता ज्या पळाल्या होत्या, आम्हाला हिरोशिमापासून घेऊन
लायबेरीच्या नरभक्षकांपासून वाचवून,
अमेरिकन बॉम्ब फुटायच्या आधीच त्या आम्हाला फिलिस्तानातून घेऊन पळाल्या आणि जेव्हा त्यांना ठाऊक झाले की मातांचा नसतो कुठलाही देश, तर त्या संपूर्ण निसर्ग बनल्या.

संपूर्ण निसर्ग बनल्या त्या
आणि आम्ही समजूही नाही शकलो,
लढत राहिलो युद्ध,
करत राहिलो धूर तिच्या देहावर
आणि
आपण स्वतःच बनलो तिचा कॅन्सर

निसर्ग
तेव्हाही आमची माताच राहिली

पण आम्ही कधी आपल्या मातांना संधी नाही दिली
आपल्या देहाचे व्याकरण समजून घेण्याची आणि
कुठल्याशा एके दिवशी त्या धडपडून कोसळल्या
आपल्या उरातल्या वेदनेने अशा,
जणू काही जीवनातल्या सगळ्या शक्यता एखाद्या डोंगराप्रमाणे तुटून पडल्या असाव्यात किंवा
होऊन जाव्यात जलमग्न!

मूळ हिंदी कविता : हर्ष भारद्वाज

मराठी अनुवाद : भरत यादव
yadavbh515@gmail.com
संपर्क : 9890140500


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]