जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा!

अंनिवा -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीमध्ये मागणी.

मालवण येथे अंनिसच्या राज्यकार्यकारिणी बैठकीत पुढील सहा महिन्यांच्या कामकाजाबाबत चर्चा करून जे निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती देताना अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल थोरात, अण्णा कडलास्कर म्हणाले की, अंनिसच्या वतीने मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत संघटना बांधणीसाठी राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. राज्यभरात अंनिसचे ५००० सभासद करण्याचे उद्दिष्ट राज्य कार्यकारिणीने घेतले आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये जादूटोणाविरोधी कायद्यास १० वर्षेपूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यव्यापी ‘कायदा प्रबोधन यात्रा’ काढण्यात येईल. तसेच देशभर हा कायदा लागू व्हावा, या मागणीसाठी ‘कायदा मागणी राष्ट्रीय परिषद’ आयोजित केली जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील १० पुस्तिकांची निर्मिती या सहा महिन्यांत केली जाईल, यामध्ये ५ पुस्तिका या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या असतील. अत्यंत कमी किमतीत या पुस्तिका जनतेसाठी उपलब्ध असतील. प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियानाचे वर्षभरात १००० कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केले आहेत. या अभियानाची समारोप परिषद सातारा येथे जुलै २०२३ मध्ये आयोजित करण्यात येईल. अंनिसच्या मानसमित्र प्रकल्पांतर्गत ‘भावनिक प्रथमोपचार’ यावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. वरील सर्व निर्णय हे सामूहिक निर्णय प्रकियेतून घेण्यात आले.

बैठकीस राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे (नागपूर), सम्राट हटकर (नांदेड), प्रवीण देशमुख (डोंबिवली), डॉ. हमीद दाभोलकर, प्रकाश घादगिने (लातूर), अ‍ॅड. देविदास वडगावकर (उस्मानाबाद), प्रभाकर नानावटी (बेळगाव), डॉ. श्यामकांत जाधव (अंबरनाथ), नरेंद्र कांबळे (वर्धा), विजया श्रीखंडे (नागपूर), संदेश गायकवाड (पेण), संजय कोले (इचलकरंजी) यांच्यासह राज्यभरातून २०० कार्यकर्ते उपस्थित होते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]