नागपूर येथील ‘महा.अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद

रामभाऊ डोंगरे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी बैठक प्रथमतःच क्रांतिभूमी, नागपूर येथे मोठ्या हर्षोल्लासात झाली. जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी हॉल, वानाडोंगरी, हिंगणा येथे झालेल्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्तेमहाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आले होते. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती असली तरी नागपूरच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थेवर अजिबात ताण पडू दिला नाही व कार्यकर्त्यांना निवास, भोजन व इतर सुविधा चोखपणे उपलब्ध करून दिल्यात.

या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या विविध विभागांद्वारे घेतलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील सहा महिन्यांचे कार्य-नियोजनावर विस्तृत चर्चा झाली. यात प्रामुख्याने बाबा व बुवाबाजी संघर्ष अभियान, झाडफूक, तंत्रमंत्राच्या नावावर गरीब, अज्ञानी लोकांची दिशाभूल व लुबाडणूक करणार्‍या तथाकथित बाबांचा पर्दाफाश करून पोलिसांच्या हवाली करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी जनजागृती अभियान राबविणे, विविध उपक्रमांद्वारे समाजात व्याप्त अंधश्रद्धांचे चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून निर्मूलन करणे.

महिला सहभागांतर्गत अधिकाधिक महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन अभियानाच्या परिघात आणणे, जुन्या रुढी, परंपरांना मूठमाती देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, विधवांच्या सामाजिक समस्या व त्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त मन व मनाचे आजार, जातिअंत संकल्प अभियान, युवा सहभाग व सोशल मीडिया, प्रशिक्षण व वार्तापत्र विभाग यावर विस्तृत चर्चा झाली.

कार्यकारिणीच्या समस्त सदस्यांना संबोधित करताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, गरिबीतून संघटना उभारावी, म्हणजे चळवळ चिरकाल टिकते. ‘महा.अंनिस’चे निर्णय हे सामूहिकपणे घेतले जातात व सामूहिक जवाबदारीचे असतात.

अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी संघटना बांधणीवर भर देऊन ‘अंनिस’चा कार्यकर्ता कसा असावा, त्याचे सामाजिक वर्तन व स्थान कसे असावे, यावर प्रबोधन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांत ‘जोतिबा का संघर्ष’ व ‘बाबा का चमत्कार, सुशिक्षित महिलेवर बलात्कार’ या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. यात माधुरी मेश्राम, रॉकी घुटके, अजय रहाटे, श्वेता पाटील, आशुतोष टेंभुर्णे, देवानंद बडगे, जान्हवी व सम्यक मेश्राम यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला सर्वतोपरी यशस्वी करण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान राहिले, ते रामभाऊ डोंगरे, प्रधान सचिव कल्पना लोखंडे, संघर्ष लोखंडे, प्रधान सचिव नीलिमा गोबाडे, डॉ. रमेशभैया राठौड, विनायक गजभिये, पिंकी डोंगरे, तनुजा झिलपे, दक्षिण शाखेच्या देवयानी भगत, सविता मेंढे, माही मोहिले, मंगला गाणार, सुषमा शेवडे, प्रीतम शंभरकर, डॉ. सुनील भगत, शशिकांत बनकर, उत्तर शाखेचे चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, आनंद मामा मेश्राम, प्रिया गजभिये, रंजना ठवरे, शीला डोंगरे, नरेश महाजन, वसंत गेडामकर, अशोक राऊत, विजयकांत पानबुडे, पश्चिम शाखेच्या विजयाताई श्रीखंडे, राम काळे, विजया ठाकरे व दक्षिण शाखेचे अरविंद तायडे, प्रशांत मोटघरे यांनी अथक परिश्रम घेतले.

रामभाऊ डोंगरे, नागपूर

राज्य कार्यकारी समिती, सदस्य


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]