अंनिसच्या ‘करणी’ या विषयावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर!

-

प्रथम क्रमांक नित्या भोईर (वाशी, नवी मुंबई),द्वितीय मुबीन सुतार (कुंभोज, कोल्हापूर)

तर तृतीय क्रमांक विभागून नरेंद्र साबळे (देवळा, नाशिक),शुभम जाधव (माणगाव, रायगड)यांना जाहीर!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने ‘करणी’ या विषयावर राज्यस्तरीय खुली चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून २५० स्पर्धकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील १७६ जणांनी चित्रे काढून पाठविली. या चित्रांचे परीक्षण अत्यंत पारदर्शकपणे शांतिनिकेतन कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील, कलाशिक्षक प्रा. सत्यजित वरेकर, प्रा. धम्मपाल श्रावस्ती, अंनिसचे कार्यकर्ते डॉ.सविता अक्कोळे, राहुल थोरात, जगदीश काबरे यांनी करून स्पर्धेमध्ये रु.दहा हजाराचे प्रथम पारितोषिक कु.नित्या भोईर (वाशी, नवी मुंबई), रु. सात हजाराचे द्वितीय पारितोषिक मुबीन सुतार, (कुंभोज, कोल्हापूर) तर तृतीय क्रमांकाचे रु. पाच हजाराचे पारितोषिक विभागून नरेंद्र साबळे, (देवळा, नाशिक), शुभम जाधव, (माणगाव, रायगड) यांना जाहीर केले.

उत्तेजनार्थ रु.दोन हजारांची प्रत्येकी ५ बक्षीसे ही रोहित खरोटे (नाशिक), दिव्या वारे (सातारा), चंद्रकांत कदम (पुणे), सतीश कवणकर (चिपळूण), सचिन घोडे (अहमदनगर) यांना तर प्रोत्साहनार्थ रु. एक हजारची तीन बक्षीसे ही कशिश विकास आडसूळ (निगवे कोल्हापूर), जान्हवी विलास पाटील, (पन्हाळा, कोल्हापूर), सुजल मंगेश निवाते, (खेड रत्नागिरी) यांना जाहीर झाली आहेत.

या सर्व स्पर्धेसाठी सर्व बक्षिसांची रक्कम ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी त्यांच्या पत्नी माधुरी काबरे यांच्या स्मरणार्थ दिली आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात सांगली शांतिनिकेतन कलाविश्व महाविद्यालयात प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन, डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते आयोजित केला जाणार आहे.

त्यावेळी स्पर्धकांच्या निवडक १०० चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सामाजिक कार्यास आपल्या कलेच्या माध्यमातून मोठा हातभार लावला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन संयोजक डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे, राहुल थोरात, आशा धनाले, त्रिशला शहा, गीता ठाकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली जिल्हा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]