चेंबूरच्या बंगाली दौलतबाबाचा ठाणे अंनिसने केला भांडाफोड

वंदना शिंदे -

मंगळवारी (दि. 26 एप्रिल) रोजी पांजरपोळ चेंबूर येथील दौलत बावीसकर ऊर्फ बंगाली बाबा याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी विजय सोंडे यांना व्यावसायिक अपयश येत असल्याने निराश होऊन त्यांनी या दौलतबाबाशी संपर्क साधला होता. त्यावेळी ‘कोकणातून कोणीतरी जादूटोणा करीत आहे, करणी करीत आहे, तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कट-कारस्थान रचले आहे, तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंधात अडचणी आहेत, तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृश्य झाले असून त्यामुळेच तुझ्यावर जादूटोणा होत आहे,’ असे सांगून साधारण 70-80 हजार रुपयांची मागणी त्यांनी सोंडे यांच्याकडे केली. मी ही अघोरी विद्या बंगालमध्ये जाऊन शिकली आहे. तुझा त्रास दूर करण्यासाठी माझे दोन सहकारी अदृश्य स्वरूपात तुझ्यासोबत नेहमी असतील, अघोरी पूजा स्मशानभूमीत करावी लागेल. यासाठी अस्सल पूजेचे साहित्य मी दुकानातून आणून देतो. यासाठी मला पैसे दे. अशी मागणी दौलतबाबाने विजय यांच्याकडे केली.

खरेतर विजय सोंडे अविवाहित आहेत. त्यांना दौलतबाबाचा भोंदूपणा लक्षात येताच त्यांनी तीन वेळा जाऊन तेथील ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. त्यांनी ठाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यासंबंधीची सविस्तर बैठक रविवारी घेऊन मंगळवारी जाण्याचे निश्चित केले. कारण मंगळवार, शुक्रवार हे बाबाने ठरवून दिलेले वार होते. त्याप्रमाणे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांची भेट घेऊन संपूर्ण केसची माहिती आणि पुरावे त्यांना दाखवताच त्यांनी देखील सहकार्य केले आणि लगेचच संशयित बंगाली बाबाला पकडण्याचे आदेश दिले. पोलिसांसोबत फिर्यादी विजय सोंडे आणि ‘अंनिस’ कार्यकर्ता अभिज्ञ हे संशयिताच्या राहत्या घरी गेले. तिथे त्यांना करणी, जादूटोण्यासाठी लागणारे सामान, अंगारे-धुपारे, काळ्या बाहुल्या आणि 150-200 पुरुषांची अंतर्वस्त्रे (अंडरवेअर), अनेक देवदेवतांचे फोटो आणि बर्‍याच लोकांचे फोटो आढळले. जवळजवळ दीड तास चाललेल्या या कारवाईनंतर संशयित बंगाली बाबाला पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कलम 3 व 5 आणि ख.झ.उ. 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या संपूर्ण केसमध्ये अंनिसच्या वंदना शिंदे आणि अभिज्ञ गंगावणे, अतुल रेगे यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच फिर्यादी विजय सोंडे यांच्यासोबत सुनील व सविता हे देखील उपस्थित होते.

वंदना शिंदे, ठाणे अंनिस


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]