विवेकी विचारांना अग्रक्रम देणारे दिवाकर मोहनी यांचे निधन

-

विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे दीर्घकाळ संपादक असलेले दिवाकर मोहनी यांचे १९ जून २०२३ रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिवाकर मोहनी यांचा जन्म गांधीवादी कुटुंबातला. त्यामुळे गांधींच्या प्रेरणा, दृष्टी आणि जीवनकार्याचा आदर्श दिवाकर मोहनी यांच्याही आयुष्याचा एक भाग बनला. गांधींच्या वैचारिक तत्त्वज्ञानाला आपल्या लिखाणाचा मुख्य आधार बनवून दिवाकर मोहनी यांनी स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यासह विविध विषयांवर तर्कसंगत मते मांडली.

‘आजचा सुधारक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांचा आवाका पाहिल्यास दिवाकर मोहनींच्या अभ्यासू वृत्तीचे व त्यांची समाजाविषयीच्या असलेल्या कळकळीची कल्पना येते. विवेकी विचारांशी सुसंगत असलेले कुठलेही विषय त्यांच्या लेखनासाठी वर्ज्य नव्हते. स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे पुरुषावलंबन, एकल माता, कुटुंब, विवाह, लैंगिक स्वातंत्र्य, योनीशुचिता, लोकशाही, समता, समान नागरी कायदा, श्रीमंती, जातीसंस्था, धर्म, धर्मनिरपेक्षता, भाषा, जात, वर्ग, आरक्षण, रोजगार, खादी आणि रोजगार, विज्ञानाचा हेतू, रोजगार हमी योजना, आध्यात्मिक शिक्षण, मनुस्मृती, सावरकर, प्रमाण भाषा अशा विविध विषयावर त्यांनी मते मांडली, चर्चा केली व या विषयावर अनेकांना लिहिते केले.

अभ्यास, चिंतन, कृती आणि आकलन या चार पायांवर उभा असलेला विवेकवाद मानवी मूल्यांचे रक्षण करेल, या आशावादावर कायम लेख लिहिणारे दिवाकर मोहनी आज आपल्यात नाहीत, याचे दुःख वाटते. त्यांचे इच्छेनुसार देहदान करण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिवाकर मोहनी यांना हृदयपूर्वक आदरांजली.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]