श्वेता सुभेकर यांचे मरणोत्तर नेत्रदान

मोहन भोईर -

नागोठणे येथील महाराष्ट्र अंनिसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य विवेक सुभेकर यांच्या पत्नी श्वेता सुभेकर (वय ५४) यांचे बुधवारी (ता. ३ जानेवारी) दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्याचबरोबर मरणोत्तर पारंपरिक चालीरीती व कर्मकांड करण्यात आले नाही. शिवाय दशक्रिया व उत्तरकार्य देखील केले जाणार नाही. श्वेता सुभेकर या महा. अंनिसच्या कार्यकर्त्या व लायन्स क्लबच्या सदस्य होत्या. दोन्ही संघटनांच्या कामात त्या हिरिरीने सहभागी असायच्या. पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. याशिवाय त्या व्यवसाय व जोडीला संसार देखील उत्तम प्रकारे सांभाळत होत्या. मागील महिन्यात त्यांना चौथ्या लेव्हलच्या कर्करोगाचे निदान झाले. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती विवेक सुभेकर यांनी लागलीच श्वेता यांचे नेत्रदान केले आहे. हे डोळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी येणार आहेत. श्वेता यांचे मरणोत्तर अवयव व देहदान करायचे होते. मात्र संपूर्ण शरीराला कर्करोगाने ग्रासल्याने अवयव व देहदान करता आले नाही. श्वेता यांचा अंतिम संस्कार करताना मडके धरण्यात आले नाही. या वेळी कोणतीही पूजाअर्चा केली गेली नाही. फक्त शरीर दहन करण्यात आले. तसेच मरणोत्तर कोणत्याही दशक्रिया किंवा बाराव्याचा विधी सुद्धा करण्यात येणार नाही.

विवेक सुभेकर यांनी पुरोगामी पाऊल उचलत त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देखील कोणतीच कर्मकांडं केली नव्हती. अनेकांनी त्यांना याबाबत विरोध केला. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी अशाच प्रकारचे पुरोगामी पाऊल उचलले. पुरोगामी संकल्पनांना कृतिशील रूप देत सुभेकर कुटुंबीयांनी मोठी हिंमत दाखवली आहे व समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

मोहन भोईर, पेण जि. रायगड


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]