-
-आपण टीव्ही अंँकर बनण्याआधी काय करत होते?
-मी एका ‘लिंचिंग’ ग्रुपचा मेंबर होतो.
-टीव्ही अंँकर बनल्यानंतर जुना अनुभव आपल्या कामी आला?
-खरेतर जुन्या अनुभवांच्या आधारावरच मला टीव्ही अंँकर बनवले गेले आहे.
-‘लिंचिंग’चा अनुभव टीव्ही अंँकरच्या कामासाठी कसा काय उपयुक्त ठरला?
-‘लिंचिंग’ करण्याकरिता ज्या संताप आणि घृणेची गरज पडत असते, ते अंँकरिंग करताना माझ्या खूप कामी आले. ‘लिंचिंग’ करताना जसे हात-पाय चालवले जातात, त्याचप्रमाणे टीव्ही अंँकरिंंग करतानाही मी हात-पाय चालवतो, जे लोकांना आवडते. -तर आपण रस्त्यावर ‘लिंचिंग’ करणे सोडून दिले?
-मला वाटलं, लहान काम आहे.
-त्यानंतरच आपण टीव्ही अंँकर बनलात?
-‘टीव्ही अंँकर’ माझ्यासाठी छोटा शब्द आहे.
-मग आपण आपल्यासाठी कोणता शब्द वापराल?
-‘टीव्ही लिंचेर’ म्हणू शकता.
-तर आपण टीव्हीवर कोणता कार्यक्रम करत असता?
-तोच जो पूर्वी रस्त्यावर करत होतो.
-म्हणजे आपण आधी ‘लिंचिंग’ करत होता आणि आता जे करत आहात यात तर बराचसा फरक आहे ना?
-नाही.
-कसे?
-पूर्वी आम्ही सर्वजण मिळून एखाद्या माणसाचे ‘लिंचिंग’ करत होतो.
-आणि आता?
-आता मी एकटा लाखो लोकांचे ‘लिंचिंग’ करत असतो.
-याच व्यवसायात कायम राहणार की भविष्यात आणखी काही करण्याचा विचार आहे?
-राजकारणात जाण्याचा विचार आहे.
-निवडणूक लढविण्यासाठी तिकीट मिळू शकेल?
-हो, का नाही?
-जर ‘लिंचिंग’साठी तिकीट मिळाले होते तर निवडणुकीसाठी का नाही मिळणार??
मूळ हिंदी लघुकथा : असगर वजाहत
मराठी अनुवाद : भरत यादव