सर्वपितरी अमावस्येच्या निमित्ताने मअंनिसने वसतिगृहातील मुलींना खाऊ वाटप

-

दिनांक २१ सप्टेंबर, रविवार रोजी, पेण येथील अहिल्या महिला मंडळात शिकणार्‍या आनंदी वसतिगृहात दरवर्षी प्रमाणे उपक्रम घेण्यात आला. पाणीपुरी, भेळ असे चाट पदार्थ आणि खजूर बदाम असा पौष्टिक खाऊ अंनिस (शाखा पेण)च्या वतीने मुलींना देण्यात आला.

भुके नाहीं अन्न। मेल्यावरी पिंडदान॥१॥
हे तो चाळवाचाळावी। केलें आपण चि जेवी॥ध्रु॥ 
नैवेद्याचा आळ। वेचे ठाकर्णी सकळ॥२॥
तुका म्हणे जड। मज न राखावें दगड॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आजचा उपक्रम आयोजित केला होता.

स्वर्गस्थ पितरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी अनेक जण कावळ्याला अन्न खाऊ घालतात. त्या ऐवजी आपल्या समोर असलेल्या पुढच्या पिढीला त्यांच्या आवडीचे खाद्य पदार्थ द्यावेत,  आणि पितरांचे ऋण फेडताना मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवावे, असा संदेश अंनिस(शाखा पेण) यांनी यानिमित्ताने दिला. चमत्कार संशोधन दिनाबद्दल माहिती दिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय त्याबद्दल सांगितले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र अंनिस शाखा पेणतर्फे जगदीश व योगिता डंगर, एन जे पाटील सर, श्रीमती स्मिता पाटील मॅडम, नितीन निकम, संचिता व संदेश गायकवाड व सावनी गोडबोले हजर होते.

तर मंडळाच्या व्यवस्थापिका अश्विनी गाडगीळ, वासंती देव, मंजुषा कुलकर्णी, वर्षा देव या सर्व कार्यक्रमाला हजर होत्या. दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी आपापल्या संस्थेच्या कार्याबद्दल  माहिती दिली.

सदर उपक्रमाचे संपूर्ण नियोजन नितीन निकम सरांनी व्यवस्थित पार पाडले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]