सांगोला येथे शिक्षकांचे वैज्ञानिक जाणीव जागृती प्रशिक्षण शिबीर संपन्न!

डॉ. प्रभाकर माळी -

२१ सप्टेंबर ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ निमित्ताने सांगोला अर्बन बँकेच्या महात्मा फुले सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगोला जिल्हा सोलापूर रोटरी क्लब ऑफ सांगोला सांगोला अर्बन बँक सांगोला व मराठी विज्ञान परिषद सांगोला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणीव जागृती प्रशिक्षण शिबिर प्रचंड उत्साहात संपन्न झाले. सांगोला तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी एका आगळ्यावेगळ्या वैज्ञानिक जाणीव प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी आनंद लोकरे, उद्घाटक सुयोग नवले, (गटशिक्षणाधिकारी), प्रमुख उपस्थिती डॉ. प्रभाकर माळी (माजी नगराध्यक्ष सांगोला), इंजिनियर विकास देशपांडे (अध्यक्ष रोटरी क्लब सांगोला), सुभाष वेळापुरे (मुख्य कार्यकारी अधिकारी सांगोला अर्बन बँक) यांची उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये विविध अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयांचा ऊहापोह करण्यात आला. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर डॉ. राजेंद्र सूर्यवंशी (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. स्त्रिया आणि अंधश्रद्धा या या विषयावर डॉ. अस्मिता बालगावकर, (मानसशास्त्रज्ञ व कार्याध्यक्ष अंनिस सोलापूर) यांनी सखोल मार्गदर्शक करून विचार प्रवृत्त केले. मन मनाचे आजार, देवीचे अंगात येणे भुताचे झपाटणे याविषयी विजय माने (प्रधान सचिव सोलापूर जिल्हा) यांनी मार्गदर्शन केले. भोजनानंतरच्या दुपारच्या सत्रात जादूटोणाविरोधी कायदा पार्श्वभूमी, वस्तुस्थिती आणि अंमलबजावणी याबाबत राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार दशरथ रणदिवे व वीर पोतदार (सातारा) यांनी अनेकविध प्रात्यक्षिकेत उदाहरणे देऊन कायद्याचे महत्त्व व अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शेवटच्या सत्रामध्ये बाबा बुवा, मांत्रिक तांत्रिक, दैवी चमत्काराचा दावा करून लोकांची जी मानसिक शारीरिक आर्थिक फसवणूक करतात याबाबत सविस्तर मांडणी प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह विनायक माळी (मंगळवेढा)आणि प्रशांत पोतदार (सातारा) यांनी सविस्तरपणे आगळावेगळ्या पद्धतीने मनोरंजनात्मक प्रात्यक्षिकांसह करून दाखवली. सदर शिबिराला सांगोला तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. यानिमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित नवीन पुस्तकांच्या विक्रीलाही भरभरून प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी करत असलेले हे काम अतिशय मौल्यवान असून आज पर्यंतच्या अनेक प्रशिक्षणांमधील हे अत्यंत आगळ्या आणि वेगळे आम्हाला विचार प्रवृत्त करणारे असे प्रशिक्षण ठरले असे उद्गार आपल्या समारोपाच्या मनोगतात शिक्षक बंधूंनी व्यक्त केले. सांगोला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदर शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

– डॉ. प्रभाकर माळी, सांगोला


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]