गुप्तधनाच्या लालसेतून नरबळीचा प्रयत्न

-

पत्नीच्या सतर्कतेने पतीचा डाव फसला

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील संतोष पिंपळे यांचे राहते घर शंभर वर्षांपूर्वीचे जुने असून जवळपास त्यांच्या पाच पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करून होत्या. दरम्यान, डोणगाव ही निझामकालीन बाजारपेठ असल्याने या ठिकाणी जुन्या घरांमध्ये गुप्तधन असल्याची गावात कायम चर्चा असते.

याच गुप्तधनाच्या लालसेपोटी संतोष पिंपळे व गावातील जीवन पिंपळे यांनी घरातील गुप्तधन काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेडच्या एका मांत्रिक महिलेला घरी आणून शनिवारी जुना वाडा दाखविला. यामध्ये त्या महिलेने प्रकाश पडतो, या ठिकाणी धन आहे, असे संतोष पिंपळे यांना सांगितले. हे धन मिळवण्याच्या लालसेतून या दोघांनी नरबळी देण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी असलेल्या संतोष पिंपळे यांनी त्यांची पत्नी सीमा पिंपळे हिला गुप्तधन असल्याच्या ठिकाणाची पूजा करण्याचे सांगितले. परंतु तिने यासाठी नकार दिला. त्यामुळे तिच्या पतीने तिला मारहाण केली. त्यामुळे ही महिला वाटूर येथे माहेरी वडिलांकडे निघून गेली.

दरम्यान, आपला पती गुप्तधनासाठी नरबळी देत असल्याची माहिती वडिलांना दिल्याने सीमा पिंपळे व तिच्या वडिलांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन गाठले. या संदर्भात सविस्तर माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाकरे यांनी तातडीने स्वतः पथक डोणगाव येथे रवाना केले. त्या ठिकाणी त्यांना जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. त्यामुळे जीवन पिंपळे व संतोष पिंपळे या दोघांना ताब्यात घेतले. याकामी मदत करणार्‍या मांत्रिक महिलेस देऊळगावराजा तालुक्यातील उंबरखेड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्तधनासाठी होणारा नरबळी टळला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक सतीश दिंडे, किरण निर्मल, पंडित गवळी, गणेश पवार, गजेंद्र भुतेकर, महिला पोलीस छाया निकम आदींनी केली.

महा.अंनिसचे वाटुर येथील कार्यकर्ते अनिल वटाणे हे या नरबळी प्रकरणात वाचलेली महिला, तिचा मुलगा व आईवडिलांना नुकतेच भेटले. त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना महा.अंनिसआपल्या पाठीशी असल्याचे सांगीतले. पीडित महिलेला खूप मारहाण झालेली आहे. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी महा.अंनिसपाठपुरावा करणार!

अं.नि.. जालना


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]