डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ पुस्तिका ब्रेल लिपीत..

-

ब्रेल मधील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार दृष्टिहीन व्यक्तींना

अंधश्रध्दामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील डॉ. हमीद दाभोलकर

ब्रेल मधील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार दृष्टिहीन व्यक्तींना अंधश्रध्दामुक्त जीवन जगण्याचा साठी प्रेरित करतील. निसर्गाने आपल्याला दृष्टी दिलेली नसली तरी आपल्या बुद्धीचा वापर करून आपण डोळस जीवन जगू शकतो असे प्रतिपादन अंनिसचे कार्यकर्ते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ते ब्रेल रूपांतरित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा प्रकाशन सोहळा लायन दिलीपसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत आळंदी (जि.पुणे) येथील NFBM संस्थेच्या जागृती अंध मुलींच्या विद्यालयात उत्साहात पार पडला.

यावेळी डॉ. दाभोलकरांच्या ब्रेल लिपितील पुस्तकातील काही उतार्यांचे वाचन दृष्टिहीन मुलींनी केले.डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की, दृष्टी असूनही डोळ्याला झापड लावणार्‍या वर्गाला दृष्टी नसताना देखील विवेकी विचार समजून घेणार्‍या लोकांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. दैवी शक्तीचा दावा करून अंधत्व दूर करण्यासाठी उपचार करणार्‍या भोंदू बाबांच्या पासून आपण दूर राहू. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मौलिक विचार घरोघरी पोहोचविण्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीला ब्रेल रूपांतरित साहित्याने बळ प्राप्त झाले आहे.

अंनिसच्या हितचिंतक लायन उषा येवले यांच्या प्रयत्नातून डॉ. नरेंद्र दाभोलकर्‍यांच्या १२ पुस्तिका ब्रेल लिपीत आता उपलब्ध झाल्या आहेत. डॉ. हमीद दाभोलकरांनी दृष्टीहीन मुलींशी सरळ संवाद साधत श्रद्धा, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, त्याचे समाजावर होणारे परिणाम याचे

समर्पक विवेचन केले. मुलींनी तत्परतेने दिलेल्या प्रतिसादाने सर्वजण भारावून गेले व डोळस व्यक्तींपेक्षा या कुठेही कमी नाहीत याचा सर्वांना प्रत्यय आला.जातपात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी माणुसकी जपण्याचा मार्ग सांगितला त्याचे सर्वांनी आचरण करावे असे प्रतिपादन लायन डॉ.दिलीपसिंह मोहिते यांनी केले.

जागृती संस्थेच्या मुख्याध्यापिका मंगलाताई वानखेडे यांनी येवले परिवार गेल्या २० वर्षांपासून संस्थेसाठी करीत असलेल्या सहकार्याचा उल्लेख केला आणि ब्रेल लिपीत मौलिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी महाराष्ट्रातील पुणे, सांगली, मिरज, धाराशिव येथील दिव्यांग संस्थेतील प्रतिनिधींना मान्यवरांचे हस्ते १२ पुस्तिकांचा संच सुपूर्त करण्यात आला.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ब्रेल लिपितील पुस्तके NFBM संस्थेच्या मुद्रण विभागाचे प्रमुख श्री. गजानन मगर (९९२२० ६३८३६) यांचेकडे अल्प किंमतीत उपलब्ध होतील. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लायन अशोक येवले यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाची सुरुवात जागृतीच्या दिव्यांग मुलींनी हृदयस्पर्शी स्वागत गीताने केली. त्याचे शब्द आणि गाण्यातील गोडवा उपस्थितांना आपलेसे करणारा होता. श्रीमती घुले आभार प्रदर्शन, तर लायन अशोक येवले यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मिलिंद देशमुख, प्रतिभा व अरविंद पाखले, पुणे व चाकण परिसरातील अं.नि.स.चे कार्यकर्ते, लायन मारुती मुसमाडे, दुर्गाशंकर बेहरा यांनी उपस्थित होते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]