पुण्यात भोंदू बाबाकडून 5 मुलींचं लैंगिक शोषण भोंदू बाबा सोमनाथ चव्हाण बाबास अटक

नंदिनी जाधव -

सोमनाथ चव्हाण नावाच्या भोंदू बाबाला पकडून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांचेकडे तक्रार आलेनंतर पिडीत कुटुंबांची भेट घेऊन महिलांना धीर दिला, त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार करणेसाठी मोलाची मदत केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना या घटनेचे गांभीर्य पटवून देऊन गुन्हा नोंद करणेस सांगितले.

आमचेकडे प्रथम जादूटोणा, करणी अंतर्गत फसवणुक झालेबाबत ही केस आली होती.याबाबत चौकशी साठी पिडीतांच्या घरी गेले असता त्याच्यांशी बोलताना वेगवेगळ्या अँगलनी चौकशी केली असता, अल्पवयीन मुलींनी त्यांच्यावर झालेल्या शारिरिक अत्याचाराबाबत अंनिसचे कार्यकर्त्याना सांगितले. तेव्हा हा प्रकार खुपच गंभीर असल्याचे समजले. येथे एक नाही तर पाच अल्पवयीन मुलीचे शोषण झाले होते. तेव्हा दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला जाऊन पी. आय. वाघमारे सरांना या प्रकाराबाबत सविस्तर सांगितले.तसेच डीसीपी सुधीर हिरेमठ सरांनाही भेटुन त्यांनाही या प्रकाराबाबत सर्व माहीती दिली.त्याप्रमाणे केस दाखल करण्यात आली.

पुणे : घरात गुप्तधन असल्याचं आणि मुलगा होणासाठी अघोरी पूजा करायला लागेल, असं सांगून भोंदू बाबाकडून एकाच घरातील पाच महिलांच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. अघोरी प्रथा आणि जादूटोणा करून पैसे उकळण्याचे आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पुजेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणार्‍या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं, असा धक्कादायक प्रकार तो करायचा, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घरात गुप्तधन असल्याचं आणि मुलगा होणासाठी अघोरी पूजा करायला लागेल, असं सांगून भोंदू बाबाकडून एकाच घरातील पाच महिलांच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सोमनाथ चव्हाण, असं आरोपीचं नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींच्या योनीमार्गात सुपारी ठेऊन त्यांना कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा खुलासाही पोलीस तपासात करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाकडून 3 लाख 11 हजार रूपये अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले आहेत. तुमच्या घरातमध्ये पुत्रप्राप्ती होऊ नये यासाठी तुमच्याच एका नात्यातील बाईने करणी केली आहे, असं सांगून पीडित कुटुंबियांना भुरळ पाडली.

इतकंच नाही तर तुमच्या घराच्या एका खोलीमध्ये गुप्तधन आहे. त्यामध्ये आत 7 पेट्या धन, एक सोन्याची घागर आणि एक गणपतीची मूर्ती असा खजिना असल्याचं सांगितलं. तुमच्या घरातील मनाली नावाच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला पुत्र हवा असेल, मनालीचा जीव वाचवायचा असेल आणि खजिना हवा असेल तर घरात उतारा टाकावा लागेल आणि नग्न पूजा करावी लागेल, असं या भोंदू बाबाने पीडित कुटुंबियांना सांगितलं.

या सगळ्या विधीसाठी 3 लाख खर्च आणि माझी 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागले. पुढच्या 15 दिवसांत उतारा टाकला नाही तर घरातील सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबाला घाबरवलं. अशा प्रकार अंधश्रद्धेची भीती घातल्यामुळे कुटुंबीय अघोरी विद्या करण्यासाठी तयार झाले. पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी घरातील सोनं विकलं आणि आरोपी सोमनाथला पैसे दिले. त्यानंतर 20 दिवसांनी घरी येत सोमनाथने एक काळी कोंबडी, बाहुल्या, टाचण्या, पांढरे कापड, मीठ, लिंबू, कोहळा आणि खूप सामान घेऊन आला. त्यानंतर त्याने प्रत्येकावर उतारा टाकण्यास सुरुवात केली. सगळ्यांच्या अंगावरील कपडे त्याने काढून स्वत:कडे ठेवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबातील एका तरुणीशी लग्न केल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर महिलांना नग्न करून त्यांच्या छातीवर लिंबाचा रस चोळयचा. त्यानंतर त्यांच्या योनीला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करत जिभेने चाटायचा अशी माहितीही पीडितेने पोलिसांना दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण आहे.

पीडितेने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली असून, भोंदूबाबावर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 354, 354 (अ), 376, 376 (1) (अ), 376 (3), 376 (अ ब), 494, 496, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. अधिक पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

यासंदर्भात डीसीपी सुधीर हिरेमठ, पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, सुधीर चव्हाण इत्यादींनी उत्तम सहकार्य केले त्यांचे अभिनंदन. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुभाष सोळंकी, श्रीराम नलावडे आणि दिलीप कामत यांनीही या कामी मोलाचे सहकार्य केले.