बबन पारेकर - 9422061999

बहुजनांनी आता जागावं
विज्ञानयुगातही यावं ॥धृ॥
आतापर्यंत होतो आम्ही अज्ञानी
आता झालोय आम्ही सज्ञानी।
शिकून-सवरून अज्ञान घालावावं
अज्ञान आता पळवावं ॥1॥
आतापर्यंत केली खिवारी
पर्याय नव्हता, भीकफेरीला तरी।
भटक्यांनी एका जागी राहावं
स्थिर व्हावं… स्थिरतेला प्राधान्य द्यावं॥2॥
बारा बलुतेदार हैराण झाले
पारंपरिक उद्योग नष्टच झाले।
त्यांनी पर्यायामागं लागावं
आता लागावं… आता शोधावं॥3॥
शेतकरी, कुणबी मेटाकुटीला आले
शेतमजुरांचे हाल सुरू झाले।
मालाच्या भावासाठी जागावं
एक व्हावं आणि उठावं ॥4॥
सर्वांनी ध्यानात घ्यावा मंत्र
चिकित्सा हे खरेच तंत्र
बबन पारेकर विनवी… आता विनवी…
सगळ्यांनी सावध व्हावं… ॥4॥
–बबन पारेकर, सातारा.
मोबा. 9422061999