महाराष्ट्र अंनिसच्या मध्यस्थीने ऐतिहासिक निर्णय

प्रशांत पोतदार -

मुलीने आंतरजातीय लग्न केले म्हणून बहिष्कृत देशमुख कुटुंब वाळीत प्रकरणी नंदीवाले समाजाने सामंजस्य भूमिकेतून बहिष्कार मागे घेतला.

मेढा (ता. जावळी, जि. सातारा) येथील रहिवासी शशिकांत देशमुख यांची मुलगी रोमाली देशमुख हिचा विवाह तिच्या पसंतीनुसार व सर्व समाजाला सांगून, विवाहाला निमंत्रित करून आंतरजातीय केला असतानाही त्यांच्याच नंदीवाले समाजातील जातपंचांनी देशमुख कुटुंबीयांना बहिष्कृत केले. त्यानंतर समाजातील अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावले नाही. या बहिष्कार प्रकरणात पोलादपूर (जि. रायगड), नागेवाडी, मेढा (जि. सातारा), रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील जातपंच सहभागी होते.

याबाबत ‘सातारा जिल्हा अंनिस’कडे जुलै महिन्यात लेखी तक्रार आली होती. याची गंभीर दाखल घेऊन सातारा पोलीस अधीक्षक बन्सल साहेब यांची ‘अंनिस’ शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करून ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ अस्तित्वात असूनही अशा घटना घडत आहेत, याकडे लक्ष वेधून संबंधित पंच व तक्रादारांना बोलवून चर्चा करावी व सामंजस्य घडवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा; अन्यथा सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या कलमान्वये रीतसर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले. या अनुषंगाने मेढा स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल माने व ‘सातारा जिल्हा अंनिस’ आणि संबंधित सर्व पंच; तसेच तक्रारदारांसमक्ष सामंजस्य बैठक झाली. बैठकीत सर्व बाजूंनी चर्चा करून जातपंचायतीद्वारे दिले जाणारे अन्यायकारक निर्णय यापुढे घेतले जाणार नाहीत. देशमुख कुटुंबातील सर्वांना यापुढे सामावून घेऊन कार्यक्रम घेतले जातील. याही पुढे जाऊन, सर्वच जातपंचांना एकत्रित करून जातपंचायत बरखास्त करून एक आदर्श निर्माण करू, असे आश्वासन सर्वच उपस्थित पंचांनी दिले. तसेच समाजातील आंतरजातीय लग्न केलेल्या व बहिष्कृत केलेल्या सर्व जोडप्यांना व इतर लोकांना एकत्रित बोलावून परत समाजात घेण्याचा निर्णय व त्यांचा सत्कार करू, असेही नियोजन भविष्यात करू, असे एकमुखाने सर्वांनी सांगितले. यावेळी ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, ‘जातनिर्मूलन’चे राज्य सदस्य शंकर कणसे बुवाबाजीविरोधी संघर्ष समितीचे राज्य सदस्य भगवान रणदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, शाखा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने जावळीचे ‘अंनिस’ कार्यकर्ते प्रतापराव सकपाळ, श्री. कांबळे, अ‍ॅड. दयानंद माने या सर्वच जणांनी बैठकीला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.

प्रशांत पोतदार, सातारा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]