-
गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अहोरात्र झटणारे पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण महर्षी नीलकंठ चिंचवडे यांचे नुकतेच निधन झाले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी चिंचवडचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या शाळेत अंनिसच्या बैठका होत. अंनिसच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असे.
चिंचवडे सर या नावाने शहरातील सर्वशृत असलेल्या नीलकंठ चिंचवडे यांनी मोठे कष्ट उपसून चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्याद्वारे सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे पाहिले, प्रसंगी शालेय शुल्क भरण्याची ऐपत नसलेल्यांनाही शिक्षणासाठी मदत केली. नीलकंठ चिंचवडे साहेब यांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.