2020 मध्ये प्रवेश करताना…
भारतीय नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंदवही (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर)च्या घोषणा, सत्ताधार्यांची सीएए, एनआरसी, एनपीआर याबाबतची विसंगत, परस्परविरोधी, दिशाभूल करणारी, धर्माधर्मांत भेद पाडणारी वक्तव्ये, 370 कलम रद्द केल्यानंतर वरवर शांत भासणार्या काश्मीर खोर्यातील खदखद, इराण-अमेरिकेमुळे मध्य आशियात निर्माण झालेल्या तणावामुळे जगभर पसरलेली चिंता, या सगळ्या पार्श्वभूमीवर 2020 सालात सदिच्छा देत-घेत आपण प्रवेश केला आहे.