शेअर बाजारातील भोंदूगिरीवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

-

चित्रा रामकृष्ण आणि भोंदूबाबाची कठोर चौकशी करण्याची ‘महाराष्ट्र अंनिस’ची मागणी

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांंतर्गत कारवाई केली जावी आणि त्यांनी ‘सेबी’ला दिलेला जबाब गृहीत धरून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन ‘अंनिस’मार्फत या प्रकरणाची तपासणी करणार्‍या सीबीआय; तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देखील देण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय शेअर बाजारासारख्या देशाच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने आपले दैनंदिन काम पाहण्यासाठी आध्यात्मिक गुरूच्या नावाखाली भोंदूबाबाचा सल्ला घेणे, ही शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यान्वये हा गुन्हा देखील आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार, ‘दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या आधारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे.’ ‘को-लोकेशन’ घोटाळाप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांनी ‘सेबी’ला दिलेल्या जबाबात ‘आपण आनंद सुब्रम्हण्यम यांची नेमणूक आणि इतर बाबींमध्ये आपल्या हिमालयातील आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होतो,’ असे नमूद केले आहे आणि या गुरूचा ठावठिकाणा विचारला असता त्यांना मानवी देह नाही, असे अतींद्रिय शक्तींचा दावा करणरे उत्तर दिले आहे.

अतींद्रिय शक्तीसारख्या कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींवर केवळ अशिक्षित लोक विश्वास ठेवतात, असे नसून सुशिक्षित आणि उच्चपदस्थ लोक देखील अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात, हे वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. आपण आपल्या खासगी आयुष्यात कशावर विश्वास ठेवावा, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्त्वाचे कार्यालयीन निर्णय हे भोंदू बाबाच्या सल्ल्याने घेणे किंवा जनतेच्या धर्मभावनांचा गैरफायदा उठवण्यासाठी एखाद्या बाबांच्या नावाआड आपले कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे, ही जनतेची फसवणूक आहे आणि हे लोकांच्या समोर यावे, यासाठी ‘महाराष्ट्र अंनिस’ या तक्रारीचा पाठपुरावा करणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. अत्यंत उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ लोक देखील अशा भोंदूगिरीला बळी पडतात किंवा त्याच्या मागे लपतात. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र अंनिस’ येणार्‍या काळात ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’ याविषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे, असे देखील यामध्ये नमूद केले आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]