जाहिरात/देणगीसाठी विनंती
प्रिय साथी,
सप्रेम नमस्कार!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य महाराष्ट्रभर प्रभावीपणे विस्तारलेले आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे मुखपत्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आणि विवेकवादी विचार- कृती यांना वाहिलेले महाराष्ट्रातील हे अशा प्रकारचे एकमेव मासिक आहे. गेली ३२ वर्षे नियमित प्रसिद्ध होणारे हे मासिक शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये या ठिकाणी जात असल्यामुळे मासिकाचा वाचकवर्ग महाराष्ट्रभर विस्तारलेला आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विवेकी वारसा हे मासिक निर्भीडपणे पुढे चालवत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी ‘वार्षिक (दिवाळी) अंक’ नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध करीत आहोत. यासाठी आम्ही या वर्षी देखील जाहिरात/देणगी संकलन करत आहोत. या ही वर्षी जाहिरातीचे दर कमी ठेवलेले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३२ वर्षांच्या वाटचालीचे आपण साक्षीदार व भागीदार राहिलेले आहात. समाजाचे उत्तरदायित्व मानणार्या आपल्यासारख्या व्यक्ती व संस्थांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे ही वाटचाल सुकर झालेली आहे. सध्याच्या आर्थिक मंदीचा फटका अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासही बसला आहे. त्यामुळे वार्तापत्राची पुढील वर्षभराची वाटचाल सुकर होण्यासाठी यावेळी आपल्या मदत आवश्यकता आहे.
चळवळीचे वर्षभराचे अर्थकारण देखील या वार्षिक अंकाच्या जाहिरातींवर अवलंबून असते. या वार्षिक अंकामध्ये आपण आपली किंवा आपल्या संस्थेची जास्तीत जास्त मोठी जाहिरात/देणगी देऊन अंधश्रध्दा निर्मूलन व विवेकवादी विचार समाजात रुजविण्याचा या कामास हातभार लावावा, ही विनंती.
– संपादक मंडळ,
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र (मासिक),
कार्तिक अपार्टमेंट, सहारा चौक, संजयनगर, सांगली -४१६४१६
फोन : 0233 2312512
ईमेल : aniva.advt@gmail.com
RNI No. MAHMAR/2000/02965