आवाहन

सप्रेम नमस्कार,

  • समाजात असलेल्या अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक गोष्टींच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता का ?
  • चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणाऱ्या आपल्या देशात अजून नरबळी दिले जातात हे तुम्हाला बोचते का ?
  • अंगात येणे करणी भानामती चेटूक चमत्काराचे दावे ह्या गोष्टींचे प्राबल्य असलेला समाज बदलला पाहिजे असे तुम्हाला वाटते का ?
  • समाजाचा विकास होण्या साठी अंधश्रद्धांचे निर्मुलन करणे आणि विज्ञानवादी होणे आवश्यक आहे असे तुमचे मत आहे ?

उत्तरसकारात्मक असेल तर महाराष्ट्र अनिस चे हे आवाहन तुमच्या सहकार्याच्या आणि मदतीच्या साठी आहे….

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य महाराष्ट्रभर प्रभावीपणे विस्तारले आहे. शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अत्यंत कष्टाने आणि विवेकी विचारावर हे संघटन उभारले आहे. समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करून,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली नवी विवेकी पिढी निर्माण करणे हे अंनिसच्या कामाचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा विवेकी कृतीशील वारसा अंनिस पुढे चालवत आहे. 

संघटनेचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक आता ३० व्या वर्ष्यात पदार्पण करीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची समग्र माहिती देणारे, बुद्धीवादी विचारांची मांडणी करणारे आणि कृतीची माहिती देणारे हे मासिक संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वाचले जाते. 

 काळानुरूप बदल म्हणून हे मासिक आता डिजिटल स्वरूपात येत आहे. या मासिकाची वेबसाइट (www.anisvarta.co.in) यासाठी सुसज्ज आहे. नव्या स्वरूपातील ही वेबसाइट महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील १३ कोटी मराठी भाषिकापर्यंत पोहचेल. त्यामुळे आपण या वेबसाइटवर दिलेली जाहिरात, सदिच्छा या कोट्यावधी लोकांपर्यंत पोचणार आहे, तसेच यातून या सामाजिक कार्यास आपला हातभार ही लागणार आहेत. 

 अंधश्रद्धा निर्मूलनाचा या सामाजिक कार्यात अनेक हितचिंतक, कार्यकर्ते आपला वेळ, श्रम, पैसा देत असतात, त्यामुळेच हे काम गेली ३० वर्षे अत्यंत जोमाने सुरू आहे. 

आपण या कामासाठी आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर आपण ते खालील प्रकारे करू शकता. 

१) संघटनेस देणगी स्वरुपात

२) मासिकात जाहिरात देऊन

३) मासिकाच्या वेबसाइटवर जाहिरात देऊन

( देणगीदारांची नावे मासिकात व वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जातील) 

वरील कुठल्याही स्वरूपात आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीस मदत करून आपण या सामाजिक कार्यातील आपला खारीचा वाटा उचलू शकता. 


‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ‘ या नावाने चेक/डीडी काढावा आणि तो कार्यालयास पाठवावा.
किंवा
ऑनलाईन देणगी खालील बॅक अंकौटवर जमा करावी. ऑनलाईन देणगी जमा केले नंतर आपले नाव व पत्ता कार्यालयास फोन करून कळवावा हि विनंती.

चळवळीस दिलेली देणगी ८० जी अंतर्गत करसवलत पात्र आहे.

Ac Name :
Andhashraddha Nirmoola Samiti Maharashtra,

Bank: The Saraswat Co. Op Bank Ltd. Branch : Satara
A.c. No. 382200100000001
IFSC Code : SRCB0000382


अधिक माहिती करिता संपर्क:

राहुल थोरात, व्यवस्थापकीय संपादक. 

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, कार्तिक अपार्टमेंट, सहारा चौक, संजयनगर, सांगली ४१६४१६

फोन: ०२३३ २३१२५१२

मोबाईल: ९४२२४११८६२

ईमेल: ansvarta@gmail.com